मुंबई

आदिवासींची जमीन परस्पर विकली आदिवासींची जमीन परस्पर विकली

CD

आदिवासींची जमीन परस्पर विकली
सहा जणांच्या टोळीविरोधात खालापूर पोलिस ठाण्यात गुन्हा

तुर्भे, ता. २७ (बातमीदार) : बनावट आदिवासी दाखले, आधार कार्ड आणि जमिनीच्या दस्तावेजाच्या आधारे सुमारे १०७ एकर आदिवासींच्या जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. स्वत: आदिवासी असल्याचे भासवून ही टोळी गोरगरीब आदिवासींच्या जमिनीची परस्पर विक्री करीत होती; मात्र एका व्यवहारात या टोळीने सादर केलेल्या कादगपत्रांची चौकशी झाल्याने हा बनाव उघडकीस आला. त्यानंतर या टोळीतील सहा जणांविरोधात खालापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी अशा प्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत.

सानपाडा येथील विक्रमेश इस्टेट एलएलपी या कंपनीसोबत चेतना इलपाते व त्यांचे सहकारी अमर खुराणा, जितेंद्र पुरी यांनी खालापूर तालुक्यातील निंबोडे येथील १०७ एकर जमिनीची विक्री करण्यासाठी करार केला होता. त्याबदल्यात त्यांनी दोन कोटींची रक्कम आगाऊ घेतली होती. आदिवासी बांधवाची जमीन हस्तांतरित करून देण्यासाठी लागणारे आवश्यक परवाने, ना हरकती, जमिनीचे दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन चेतना यांनी कंपनीला दिले होते. मात्र जमिनीचे खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करत आणखी पैशांची मागणी त्या करत होत्या. त्याची ही टाळाटाळ लक्षात आल्यानंतर कंपनीने खरेदीखतासाठी आग्रह धरला व त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू केली; तेव्हा आपल्यावर कारवाई होऊन आदिवासी जमीन मूळ मालकांना परत जाण्याच्या भीतीने चेतना इलपाते यांनी ही जमीन नर्सीमुंजी एज्युकेशन ट्रस्टला परस्पर विकली. चेतना आणि सहकाऱ्यांनी दिलेल्या दस्तावेतांची पडताळणी कंपनीने केली असता त्यांनी बनावट दस्तावेज बनवून अनेक लोकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले.


एकच जमीन अनेकांना विकल्याचा प्रकार
आरोपी चेतना इलपाते आणि सहकाऱ्यांनी एकच जमीन अनेकांना विकण्याचे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे यामध्ये उघडकीस आले. त्यामुळे विक्रमेश इस्टेट एलएलपीचे विक्रमसिंह पाटणकर यांनी खालापूर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार चेतना इलपाते यांच्यासह अमर खुराणा, जितेंद्र पुरी, नर्सीमुंजी ट्रस्टचे पदाधिकारी शैलेश गाजीवाला, हितेन शहा व अशोक मुंढे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heatwave Alert : महाराष्ट्रात उन्हामुळे अलर्ट! कामगारांना दुपारी १२ ते ४ या वेळेत सक्तीची विश्रांती; शासनाची SOP काय?

Crime: मांजर-बोक्याचं झेंगाट; ४ पिल्लांच्या जन्मामुळे मालकांमध्ये युद्ध पेटलं, मालकिनीनं शेजारच्यावर माऊला फेकलं अन्...

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

CBSE Class 10 Result 2026 OUT! तुमचा 10वीचा निकाल कसा पाहायचा? स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

SCROLL FOR NEXT