महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग करा
जेडी बाळ गोविंदा पथकाची मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. बदलापूर घटनेनंतर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. अत्याचार करणाऱ्या नराधमांना आळा घालायचा असल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील चौरंग शिक्षा द्यावी, अशी मागणी जेडी बाळ गोविंदा पथकाकडून करण्यात आली.
मागील वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा युवा सेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दादरच्या शिवसेना भवन येथे ‘निष्ठा’ दहीहंडीचे आयोजन केले होते. शिवसेनेच्या या दहीहंडीला गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी पोलीस कॅम्प पथकाचाही समावेश होता. या पथकाने सात थरांची सलामी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महिलांचा सन्मान केला जात होता. महिलांवर अत्याचार केल्यास चौरंग करण्याची शिक्षा दिली जात होती. आता महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या असून कायद्याचा धाक उरलेला नाही. या घटना रोखण्यासाठी नराधमांना चौरंग करण्याची शिक्षा देण्यात यावी.
नितेश येंडे,
अध्यक्ष, जेडी बाळ गोविंदा पथक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.