मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पालघरमध्ये

CD

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी पालघरमध्ये
वाढवण बंदराचे भूमिपूजन; प्रशासनाकडून जय्यत तयारी

पालघर, ता. २७ (बातमीदार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर येथे वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येत्या शुक्रवारी (ता. ३०) येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आयोजित सभेची जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळील सिडको मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या सभेला ६० हजार नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असून पावसाच्या पार्श्‍वभूमीवर या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येत आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सभेसाठी जिल्ह्यातून ४० ते ५० हजार महिलांना आणण्याची जबाबदारी भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि महिला बचत गटांवर सोपविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान पालघरमध्ये पावसाची संततधार सुरूच असल्यामुळे सिडको मैदानावर वॉटरप्रूफ मंडप उभारण्याठी आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे. यासाठी सध्या रात्रंदिवस काम सुरू आहे. त्यातच या मैदानावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल पसरला असल्याने या चिखलावर खडी पसरण्याचे काम सुरू आहे; तर सभास्थळी जाण्यासाठी या मैदानावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. या सभेला राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह भाजपसोबत घटक पक्षांचे राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी पोलिस मैदानावर हेलिपॅड उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पंतप्रधानांसाठी विशेष तीन हेलिपॅड, यासोबत राज्यपाल व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू आहे.


चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात
सभेसाठी येणाऱ्या वाहनांची पालघर, बोईसर या मार्गावर पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. सोबतच ‘व्हीआयपीं’साठी जिल्हा अधिकारी कार्यालयाचा परिसर हा पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणी बंदोबस्तासाठी चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. सध्या दररोज पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी केंद्रातील व राज्यातील वरिष्ठ अधिकारीवर्ग पालघरमध्ये पाहणी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT