ठाण्यात आठ गोविंदा जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ‘ढाक्कू-माक्कूम’च्या तालावर मोठ्या उत्साहात आज दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी मानवी मनोरे रचताना कोसळून आठ गोविंदा जखमी झाले. हे गोविंदा किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयांत उपचार करून त्यांना सोडण्यात आल्याची रुग्णालय प्रशासनाने दिली.
ठाणे शहरात विविध राजकीय पुढाऱ्यांच्या माध्यमातून लाखोंचे बक्षीस लावत दहीहंड्या उभारण्यात आल्या. या हंड्यांतील लोणी चाखण्यासाठी थरांचा थरार, गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, मान्यवरांची हजेरी आणि गीत-संगीतासह जल्लोष पाहायला मिळाला. मानवी मनोरे रचताना थरावरून पडल्याने काही गोविंदा जखमी झाले. तत्काळ उपचारासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय आणि ठाणे पालिकेचे कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली होती. विविध पथकांतील आठ गोविंदा किरकोळ जखमी झाले. यामध्ये कार्तिक माने (वय १३), श्रेयस पाटील (वय १८), श्रवण कांबळे (वय १९), प्रतीक ठोके (वय १२), अनिश चंद्रवंशी (वय २०), जिग्नेश तांबले (वय २६), तेजस प्रकाश गाडे (वय २४) आणि ऋषिकेश धायबर ( वय २१) यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.