बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल
इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याने कारवाई
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : जुईनगर सेक्टर-२४ भागात इमारतीच्या बांधकामासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यात राज संजय सनगरे (वय २८) या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जुलैमध्ये घडली होती. या घटनेनंतर नेरूळ पोलिसांनी केलेल्या तपासात संबंधित बांधकाम व्यावयिकाने या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नेरूळ पोलिसांनी डी.डी.एस.आर. या बांधकाम व्यावसायिकांसह इतरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
जुईनगर सेक्टर-२३ मधील परशुराम सोसायटीत राहणारा राज सनगरे ९ जुलै रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जुईनगर सेक्टर-२४ मधील मंगलप्रभू हॉस्पिटलजवळ इमारतीच्या बांधकामासाठी खोदून ठेवण्यात आलेल्या खड्ड्यातील साचलेल्या पाण्यात मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. या वेळी राज सनगरे याला पोहता न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. त्यानंतर नेरूळ पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली होती. या तपासात डी.डी.एस.आर. या बांधकाम व्यावसायिकाने या ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी खड्डा खोदून ठेवल्याचे तसेच दोन वर्षांपासून या ठिकाणी काम बंद असल्याचे आढळून आले. सोबत येथे कोणत्याही सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्र्याचे कंपाऊंड (संरक्षित भिंत) बांधले नसल्याचे तसेच त्या ठिकाणी सुरक्षारक्षक अथवा इतर कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे आढळून आले. याची दखल घेत नेरूळ पोलिसांनी या बांधकाम व्यावसायिकासह संबंधिताविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.