सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : ज्यांच्याकडे स्वत:चे वाहन नाही ते रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करतात. प्रवाशांना सेवा देण्याचे काम त्यांनी प्रामाणिकपणे केले तर त्यात नक्की यश मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने रिक्षा आणि मीटर टॅक्सीचालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याबद्दल ठाण्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांनी रविवारी (ता. २५) ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे मुख्यमंत्री शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री झाल्यापासून माझे अनेक सत्कार झाले. सध्या तर महिला-भगिनी रोजच राख्या बांधतात; मात्र आजचा हा सत्कार माझ्या कुटुंबाकडून झालेला सत्कार आहे. त्याचा विशेष आनंद वाटत आहे, असे मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. सध्या रिक्षा, टॅक्सीवर लावण्यात येणारा दंड एक हजार ५०० वरून २०० रुपये करू; पण वाहतुकीची शिस्त कुणीही मोडू नये, असा सल्लाही त्यांनी चालकांना दिला. रिक्षांच्या नवीन परवान्यांवर मर्यादा आणू, पार्किंगसाठी लावण्यात आलेला दंडही माफ केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या वेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे; तसेच ठाण्यातील विविध रिक्षा-टॅक्सी युनियनचे पदाधिकारी आणि चालक व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चालकांना विविध योजना
रिक्षा आणि टॅक्सीसाठी सुरू केलेल्या महामंडळाच्या माध्यमातून जीवन विमा अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास ५० हजारांपर्यंत अर्थसाह्य, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, कामगार कौशल्यवृद्धी योजना, परवानाधारक चालकांना निवृत्तीनंतर सानुग्रह अनुदान देणार, नवीन रिक्षा घेण्यासाठी मिळणाऱ्या कर्जाला सरकार हमी देणार, सरकारच्या इतर कल्याणकारी योजनेचे लाभ देण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.