मुंबई

नायजेरीयन महिलेचा पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न

CD

नायजेरियन महिलेचा पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न
अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणात अटक; पंचनामा सुरू असताना काढला पळ
नवी मुंबई, ता. २७ (वार्ताहर) : तब्बल ४३ लाख रुपये किमतीच्या कोकेनसह अटक करण्यात आलेल्या एका नायजेरियन महिलेने तिच्या घराचा पंचनामा करताना तिसऱ्या मजल्यावरून खिडकीद्वारे पाइपने खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी उलवेमध्ये घडली, मात्र पोलिसांनी वेळीच या महिलेला पुन्हा जेरबंद केले.

अलिशा केम (वय २५) असे आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी या महिलेविरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अलिशा ही नायजेरियन देशातील असून सध्या ती उलवे सेक्टर-१७ मधील सीवूड्स हार्मनी या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहण्यास आहे. तिला शनिवारी (ता. २४) सायंकाळी अमली पदार्थ विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना न्हावा शेवा पोलिसांनी तिला एका महिलेच्या मदतीने पकडले होते. त्या वेळी अलिशाकडे तब्बल ४३ लाख रुपये किमतीचे कोकेन आढळून आले. पोलिसांनी अमली पदार्थ जप्त करत तिला अटक केली होती.
न्यायालयाकडून अलिशाला पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिस तपासासाठी सोमवारी (ता. २६) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तिला ती राहत असलेल्या उलवे सेक्टर-१७ मधील घरी घेऊन गेले होते. या वेळी घराचा पंचनामा सुरू असताना अलिशाने महिला पोलिसांच्या हाताला हिसका देत घरातील किचनमध्ये पळ काढला. त्यानंतर तिने खिडकीवाटे बाहेर पडून गॅलरीच्या पाइपच्या मदतीने पहिला मजल्यावरून खाली उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत तिला तत्काळ जेरबंद केले. अलिशाने पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने तिच्याविरोधात न्हावा शेवा पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Love Relationship : सैराटपेक्षाही धक्कादायक! पतीला सोडून प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय, घरच्यांनी विष पाजलं; मृतदेह जाळला अन्, कर्नाटक -महाराष्ट्र कनेक्शन

Solapur Sugar Mills : साेलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारांना प्रशासनाचे अभय; चारशे कोटींहून अधिक थकीत, मोजक्याच कारखान्यांवर कारवाई!

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

SCROLL FOR NEXT