तळोजा येथे गुटख्याचा साठा जप्त
पनवेल, ता. ३० (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तळोजा येथील पेंधर गावातील एका घरावर गुरुवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या छाप्यात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. याप्रकरणी सतीशसिंग नेपाळसिंग ठाकूर (वय ३२) व जितेंद्र राजकुमार कामत (वय २१) या दोघांना पोलिसांनी अटक केली.
पेंधर गावातील एका चाळीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या व्यक्तींनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला व तंबाखूचा साठा केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप निगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नायडू, श्री. धुमाळ, श्री. कोकरे, पोलिस उपनिरीक्षक श्री. मोरे व अन्य पोलिसांच्या पथकाने गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास चाळीतील एका घरावर छापा टाकला. पथकाने घराची तपासणी केली असता नायलॉनच्या गोण्यांमध्ये गुटखा, पानमसाला, तंबाखूचा साठा आढळून आला. त्याची ५ लाख ४० हजार रुपये एवढी आहे. त्यानंतर पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त केला. याप्रकरणी सतीशसिंग ठाकूर व जितेंद्र कामत यांच्याविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.