एकाच घरात आढळले तीन मृतदेह
वाड्यातील नेहरोली गाव हादरले; हत्या की आत्महत्या? गुढ कायम
वाडा, ता. ३० (बातमीदार) : वाडा तालुक्यातील नेहरोली या गावात एका बंद घरात एका कुटुबांतील तिघांचे मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी घडली. या हत्या की आत्महत्या आहेत, हे गुढ कायम असून या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
मुकुंद बेचलदास राठोड (वय ७०) व पत्नी कांचन मुकुंद राठोड (वय ६९) व मुलगी संगीता मुकुंद राठोड (५१) अशी मृतांची नावे आहेत. नेहरोली येथील बोंद्रे आळी या ठिकाणी मुकुंद राठोड हे या ठिकाणी २५ वर्षापासून राहत आहेत. त्यांची दोन मुले मुंबई येथे राहतात. गेल्या आठ दिवसांपासून आई-वडील व बहिणीचा संपर्क न झाल्याने त्याचा मुलगा सुहास हा शुक्रवारी (ता. ३०) दुपारी नेहरोली येथे आला. घराला कुलूप बघून त्याने शेजारी चौकशी केली. शेवटी घराचे कुलूप तोडून त्याने घरात प्रवेश केला असता त्याला घरात दुर्गंधी पसरल्याचे जाणवले. त्याला बाथरूमच्या दरवाज्यात वडिलांचा मृतदेह आढळून आळा. त्यानंतर त्यांनी सरळवाडा पोलिस ठाण्यात धाव घेत याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असता घरात पत्र्याच्या पेटीमध्ये आई आणि मुलीचा मृतदेहही आढळला. या तिघांचा मृत्यू होऊन बरेच दिवस झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, या आत्महत्या की हत्या आहेत, याबाबत काही समजू शकलेले नसून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
नेहरोली या गावातील घटनेचे निश्चित कारण समजू शकलेले नाही. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.
- अजित साबळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वाडा पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.