मुंबई

मच्छिमारांच्या थडग्यांवर ‘वाढवण’चा इमला

CD

मच्छीमारांच्या थडग्यांवर ‘वाढवण’चा इमला

विरार (बातमीदार) : डहाणू-झाईपासून मुंबईपर्यंतच्या मच्छीमार समाजाचे थडगे बांधून त्यावर वाढवण बंदराचा इमला उभारला जाणार आहे. मच्छीमार समाजाच्या भावना पायदळी तुडवून हुकूमशाही पद्धतीने वाढवण बंदराचा घाट घातला जात आहे. संविधानाने दिलेली जबाबदारी विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मूठभर श्रीमंत मित्रांच्या हिताकरिता रात्रंदिवस राबत आहेत, पण जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत आमचा सर्वसामान्य कष्टकरी मच्छीमार वाढवण बंदराला विरोध करत राहील. वाढवण बंदरामुळे उद्ध्वस्त होण्यापेक्षा बंदराला विरोध करून उद्ध्वस्त होणे आम्ही पसंत करू, असा इशारा कोळी युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष मिल्टन सौदिया यांनी वाढवण विरोधी आंदोलनावेळी आज दिला.


डहाणू तालुक्यातील वाढवण येथील प्रस्तावित व्यापारी बंदराच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवणमध्ये आले होते. त्यांच्या निषेधार्थ वाढवणसह संपूर्ण किनारपट्टीवर मच्छीमारांनी निषेध आंदोलने केली. शुक्रवारी सकाळी १० वाजता स्थानिक मच्छीमार पाचूबंदर येथील जेट्टीवर जमा झाले होते. त्यानंतर हा मार्चा वाढवण बंदरविरोधी घोषणाबाजी करत तहसीलदार कार्यालयाजवळ पोहोचला. या ठिकाणी या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. दरम्यान, केंद्र सरकारच्या या वाढवण प्रकल्पाच्या विरोधात पालघर आणि वसईसह वर्सोवा, उत्तन, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथून मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात आला. शुक्रवारी आंदोलकांनी ‘मोदी गो-बॅक‘ च्या घोषणांनी संपूर्ण किनारपट्टी दणाणून सोडली. भारत स्वतंत्र झाल्यापासून देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच देशाच्या पंतप्रधानांविरोधात मच्छीमार समाज एकत्र होऊन घोषणाबाजी करण्याचा प्रकार झाला असून याला सर्वस्वी पंतप्रधान मोदींची हुकूमशाही प्रवृत्ती जबाबदार असल्याचा आरोप मच्छीमारांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT