मुंबई

बदलापूर अत्याचारप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी

CD

बदलापूर अत्याचारप्रकरणी आरोपीला न्यायालयीन कोठडी
कल्याण, ता. ३० (बातमीदार) : बदलापूरच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात दुसऱ्या चिमुरडीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी शुक्रवारी आरोपी अक्षय शिंदे याला कल्याण न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने त्याला ९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुरड्यांवर शाळेतील सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने स्वच्छतागृहात लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही पीडितेच्या पालकांनी बदलापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले होते. यामधील पहिल्या गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीला ९ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. यानंतर दुसऱ्या गुन्ह्यातही आरोपीला शुक्रवारी ‘एसआयटी’ने पुन्हा न्यायालयासमोर हजर केले. या वेळी पोलिसांनी आरोपीची पहिल्या गुन्ह्यात अजून ओळख परेड व्हायची असल्याने आरोपीला न्यायालयीन कोठडीची मागणी केली. दरम्यान, या ओळख परेडनंतर अधिक तपासासाठी पुन्हा त्याची पोलिस कोठडी घेणार असल्याचे एसआयटी पथकप्रमुख डी. बी. क्षीरसागर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT