वाढवण बंदर रस्ता व रेल्वेच्या
भूसंपादनाची अधिसूचना
- मागविल्या हरकती आणि सूचना
डहाणू (बातमीदार), ता. ११ : प्रस्तावित बहुचर्चित वाढवण बंदराच्या रस्ता आणि रेल्वेसाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील ग्रीन फील्ड हायवे एमएच २४८ एसच्या निर्मितीकरिता डहाणू तालुक्यातील ० ते ११.४ किलोमीटर आणि पालघर तालुक्यातील ११.४ किमी ते २८.७ किमीमध्ये येणाऱ्या डहाणू तालुक्यातील घोळ, तवा, कोल्हाण, धामटणे, वरोर, तणाशी, बावडे, वाणगाव, कोलवली, चिंचणी अशा ९ गावांतील ३२३.४८ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तसेच पालघर तालुक्यातील नेवाळे, राणीशिगाव, हनुमाननगर, सुमडी, गारगाव, चिंचारे, आकेगव्हाण, नानिवली, आंबेधे, अकोली रावते, शिगाव, खुताड, बोईसर अशा १४ गावांतील ३६०.७९ हेक्टर जमीन महसूल खात्यामार्फत संपादित केली जाणार आहे.
डहाणू तालुक्यातील गावासाठी भूसंपादन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी सत्यम गांधी, तर पालघर तालुक्यांतील गावांसाठी भूसंपादन अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना भारत सरकारने २९ ऑगस्ट २०२४ रोजी काढलेल्या अधिसूचनेत प्राधिकृत करण्यात आले आहे.
भारत सरकारने २९ ऑगस्ट २०२४ रोजी अधिसूचना काढून भारत राजपत्रात प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार संबंधित भूसंपादित होणाऱ्या जमिनीशी हितसंबंध असणाऱ्या व्यक्तीने अधिनियमातील कलमान्वये काही सांगायचे असल्यास ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांच्या आत त्या-त्या तालुक्यातील भूसंपादित अधिकाऱ्यांकडे आपल्या हरकती आणि सूचना सादर करण्यास सांगण्यात आले आहे. भूसंपादित होणाऱ्या अधिसूचनेची प्रत सर्व्हे नंबर/गटनंबर निहाय संबंधित तलाठी कार्यालयात माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.