जव्हार, ता. १५ (बातमीदार) : जव्हार उपविभागातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड व कासा पोलिस ठाणे हद्दीत सण-उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेल लक्ष ठेवून असल्याचे जव्हार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव पिंगळे यांनी सांगितले. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट करू नये, असे आवाहन पालघर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जव्हार उपविभागात हे दोन्ही सण साजरे करताना सर्वधर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही, याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत. जेणेकरून सामजिक सलोखा अबाधित राहील, असे आवाहन करण्यात आले आहे. उत्सवांच्या या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणुका सुरू आहेत. त्या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करताना काळजी घ्यावी. सोशलमीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा. सामाजिक जाणिवांचे भान ठेवावे. समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिवाय, नागरिकांनी समाज माध्यमांवर येणाऱ्या कोणत्याही पोस्टवर शांततेने प्रतिक्रिया व्यक्त करावी. पोलिसांची मदत घ्यावी. काही समाजकंटक अशा वेळी जुन्या पोस्ट टाकून लोकांची दिशाभूल करतात. अफवा पसरवतात, टीका करतात. त्यामुळे जनतेने सावध राहावे, असेही आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पोलिसांना द्या माहिती
जव्हार उपविभागातील पोलिस ठाणे हद्दीतील शहर व गावांना सर्वधर्मीयांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलिस ठाण्याला माहिती द्यावी.
- बाळासाहेब पाटील, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.