मुंबई

गणेशोत्सवात बहिरेपणाच्या समस्येत वाढ

CD

गणेशोत्सवात बहिरेपणाच्या समस्येत वाढ
श्वसनाच्या विकारांचाही त्रास
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : गणेशोत्सवादरम्यान विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीत फटाके फोडल्याने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांना श्रवणशक्ती कमी होतेच, शिवाय श्वसनाचे विकारही वाढत आहेत. या सणाच्या काळात दोन्ही प्रकारच्या विकारांमध्ये सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्तीत कमतरता येते. त्यामुळे ऐकण्यात अडचण येऊ शकते. कर्कश आवाजामुळे आतील कानाच्या पेशींना झालेल्या नुकसानामुळे तात्पुरता किंवा कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. काहींना कानात सतत घंटा वाजणे किंवा शिट्ट्या वाजल्याचा आवाज येतो, ज्याला टिनिटस म्हणतात.
रुग्णालयात हा त्रास सहन करणाऱ्या आठ रुग्णांपैकी चार ज्येष्ठ, दोन प्रौढ आणि दोन तरुणांचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. त्याचप्रमाणे फटाक्यांमधून निघणाऱ्या रसायनांमुळे २० ते ६५ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये ब्रॉन्कायटिस आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या समस्या वाढतात.
कान-नाक-घसा विभागाचे तज्ज्ञ डॉ. प्रशांत केवले यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात मोठ्या आवाजामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे २० ते ६५ वयोगटातील लोकांची ऐकण्याची क्षमता कमी झाली आहे. यासोबतच फटाक्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनांमुळे ब्रॉन्कायटिस आणि अस्थमासारख्या श्वसनाच्या समस्या वाढतात, असे ते म्‍हणाले.
झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. भाविक शहा म्हणाले की, सणासुदीच्या काळात डीजेमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना खूप त्रास होतो. याशिवाय गरोदर महिलांमध्ये आवाजामुळे तणाव निर्माण होतो. याचा परिणाम आई आणि बाळ दोघांवरही होऊ शकतो. ध्वनिप्रदूषणामुळे उच्च रक्तदाबसारख्या समस्या उद्भवू शकतात. हृदयावर येणाऱ्या ताणामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होऊ शकतो. चिडचिडेपणा वाढून झोपेवरही विपरीत परिणाम होतो.

अनेक आजारांना आमंत्रण
मोठ्या आवाजामुळे कानाच्या आतील पेशींचे नुकसान होते. त्याचा परिणाम शरीरावरच नाही तर मनावरही होतो. चिडचिड वाढते आणि झोपेवर वाईट परिणाम होतो. आपले कान ८० डेसिबलपर्यंतच आवाज सहन करू शकतात. सामान्य माणसाचे कान ७५ ते ८० डेसिबल आवाज सहन करतात. गर्दीच्या ठिकाणी आपण ११० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. हृदयाची शस्त्रक्रिया झाल्‍यास किंवा रक्तदाबाची समस्या असल्‍यास जास्त आवाज असलेल्या ठिकाणी जाऊ नये. गर्भवती मातांनी डीजेच्या आवाजापासून दूर रहावे. बाळाचे कान जास्त आवाजामुळे दुखत असल्‍यास कानात खोबरेल तेल घालू नका. यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य राहील, असे डॉ. शहा यांनी सांगितले.

दररोज आठ लोकांपैकी पाच ज्येष्ठ नागरिकांना श्वासोच्छवासाचा त्रास, दोन प्रौढांना घरघर आणि एक तरुणाला खोकला येतो. सण-उत्सवादरम्यान जास्त आवाज किंवा प्रदूषण होत असल्यास दारे-खिडक्या बंद करा आणि घरातच थांबा.
- डॉ. प्रशांत केवले
कान-नाक-घसा तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT