मुंबई

गणेशोत्सवात अनेकांच्या हाताला रोजगार!

CD

गणेशोत्सवात अनेकांच्या हाताला रोजगार!
बाप्पामुळे कष्‍टकऱ्यांची उपासमारीपासून सुटका
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १५ (बातमीदार) ः मुंबईत गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन भक्तिभावाने करण्यात आले असले तरी सार्वजनिक गणेशोत्सव अद्याप जोरात सुरू आहे. बाप्पामुळे कित्येक हौशी कलावंत, कामगार, विक्रेते या सर्वच घटकांच्या हाताला काम आणि कष्‍टाचे दाम मिळते. त्‍यामुळे दरवर्षी कष्‍टकरी लोक गणेशोत्‍सवाची आतुरतेने वाट पाहत असतात.
गणेशोत्सव हा सर्वांचाच आवडीचा आणि भक्तिभावाने साजरा होणार सण आहे. त्यामुळे या सणाची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. गणेशोत्सवाला व्यावसायिक रंग आल्याने मोठी आर्थिक उलाढाल होताना दिसते. मंडप कामगार, मूर्तिकार, गायक, वादक, निवेदक, पेंटर, अन्य कामगार, ढोल पथक, मंडप कामगार, महिला बचत गटांना गणेशोत्‍सव काळात रोजगार निर्माण होतो.
फुगेविक्रेते, फूलविक्रेते, बॅनर, मखरविक्रेते, महिला बचत गट, फटाके, मिरवणूक ट्रक, ढोल पथके, तसेच मोदक, लाडू, केळी, अन्य फळ, भेल, आईस्क्रीम, पाणीपुरी, चाट, डोसा, कॉर्न, पॉपकॉर्न, मंच्युरियनविक्रेत्‍यांचा या काळात धंदा तेजीत असतो. त्‍यामुळे कित्येकांच्या पोटाचा प्रश्न मार्गी लागतो. एरव्ही हाताला काम मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न उभा असताना गणेशोत्सवामुळे उदरनिर्वाह होतो.

हाताला काम मिळत नसल्याने उपासमार सुरू आहे. त्यातच गणेशोत्सव काळात १० दिवस काम मिळत आहे. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न सुटला आहे. गणेशोत्सवासह नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी सण कधी येतो त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय.
-नीलेश कदम
रंग कामगार, भांडुप

कोरोनापासून कार्यक्रम फारसे मिळत नाहीत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहतो. गणेशोत्सवासारख्या उत्‍सवांमध्ये काही कार्यक्रमात काम मिळते. थोडेफार मानधन मिळते, त्यावर कसेतरी जगतो.
- वैशाली वाडवळकर
नृत्य कलाकार, ठाणे

पालिका फुटपाथवर धंदा करायला देत नाही. गणेशोत्‍सव काळात फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे उदरनिर्वाह भागतो.
- सुरज चौहान
फूलविक्रेता, चेंबूर

आमचा ढोल-ताशांचा पारंपरिक व्यवसाय आहे. लग्न सराईत काही
ऑर्डर मिळतात, मात्र खरा धंदा हा गणपती सणाला होतो. त्यामुळे उपासमारीची वेळ येत नाही.
- जयवंत सर्जेराव
महाराणा बॅंड, दादर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT