मुंबई

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी

CD

राज्यघटनेबाबत जागृतीसाठी संविधान मंदिर प्रेरणादायी!
उपराष्ट्रपती धनखड यांचे प्रतिपादन

मुंबई, ता. १५ : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असून भारतीय राज्यघटना ही सर्वार्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेबाबत नवीन पिढीत जागृतीसाठी संविधान मंदिर नक्कीच प्रेरणादायी ठरेल,’ असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे कौशल्य विकास विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत ४३४ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिर लोकार्पण सोहळा झाला. यावेळी उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, विकास आयुक्त प्रदीपकुमार डांगे, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येथून दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, ‘भारतीय संस्कृतीचे सार आपल्या संविधानात सामावले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये खूप मोठे योगदान आहे. राज्यघटनेचा गाभा आपण समजून घेणे गरजेचे आहे. या संविधानाचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, यासाठी असे उपक्रम खूप गरजेचे आहेत.’ केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी, सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संविधान मंदिराच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असे मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले. यावेळी भदंत डॉ. राहुल बोधी (महाथेरो), भदंत बोधिशील स्थंविर, राजकुमार त्रिमुखे, बाळू अहिरे, हनुमंत लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
...
बेरोजगारी कमी होईल!
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले, ‘आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९०४ ते १९०७ या काळात जेथे शिक्षण झाले त्या ठिकाणी आपण उभे आहोत, याचा अभिमान वाटतो. एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल ही पहिली शाळा आहे, ज्या शाळेने देशातील आजच्या कौशल्य विकास विभागाचा पाया घातला. अनेक नावीन्यपूर्ण योजना कौशल्य विकास विभागाने सुरू केल्या आहेत, त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होत आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT