मुंबई

जीवदानी मंदिरावर तिसऱ्या डोळ्याची नजर

CD

विरार, ता. ३० (बातमीदार) : विरारसह देशभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान म्हणून जीवदानी मंदिर ओळखले जाते. नवरात्रोत्सवात जीवधन गडावर मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. मंदिर परिसरात १५० सीसीटीव्हींच्या माध्यमातून तिसऱ्या डोळ्याची सतत नजर असणार आहे. त्याचबरोबर कोणताही घातपात होऊ नये, म्हणून शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. त्याचबरोबर नवरात्रोत्सवात गडावर भाविकांची गर्दी होणार असल्याने त्याचे नियोजन केल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी दिली.

मंदिर सुरक्षेचा आढावा दहशतवाद विरोधी पथका (एटीएस)नेसुद्धा घेतला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी सुरक्षा कवचही उभारण्यात आले आहे. नऊ दिवस मंदिरात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांच्या जोडीला विवा महाविद्यालयाचे २०० एनसीसी विद्यार्थी हजर असणार आहेत. जीवदानी मंदिरात जण्यासाठी असलेल्या फेनिक्युलरची चाचणीही यशस्वी झाली आहे. नवरात्राेत्सवात येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचे विनामूल्य वाटप करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गडावर ५० हजारांच्या आसपास भाविकांची गर्दी होणार आहे. रविवारी हाच गर्दीचा आकडा लाखांमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे प्रदीप तेंडोलकर आणि पंकज ठाकूर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT