मुंबई

पालिका कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित

CD

विरार, ता. ३ (बातमीदार) : निवडणुकीच्या दैनंदिन-कंत्राटी तत्त्वावर नेमलेल्या कर्मचारी वर्गाला अतिकालिक भत्ता देय नाही, असे राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परिणामी वसई-विरार महापालिका कर्मचारी निवडणूक भत्त्यापासून वंचित आहेत. त्यामुळे महापालिका कार्यालयातील कंत्राटी-ठेका कर्मचाऱ्यांत नाराजी आहे. त्यांची अतिकालिक भत्त्याची मागणी असून, ही रक्कम न मिळाल्यास विधानसभा निवडणुकीचे कोणतेही निवडणूक काम न करण्याचा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी वसई-विरार महापालिकेच्या कंत्राटी-ठेका कर्मचाऱ्यांची बोईसर, नालासोपारा आणि वसई मतदारसंघाकरिता नियुक्ती करावी लागणार आहे. त्यामुळे ही गरज ओळखून या कामासाठीचा अतिकालिक भत्ता या कर्मचाऱ्यांना मिळावा, अशी विनंती प्रातांधिकारी तथा निवडणूक अधिकारी शेखर घाडगे यांनी पालघर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे. वसई तालुक्यात तीन विधानसभा मतदारसंघ येतात. यातील बोईसर मतदारसंघातील काही भागांत १८६ मतदान केंद्रे, नालासोपारा क्षेत्रात ५११ आणि वसई क्षेत्रात ३४८ मतदान केंद्रे येतात. या निवडणुकीच्या कामकाजाकरिता इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचारी कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता असल्याने महापालिकेतील कंत्राटी-ठेका कर्मचाऱ्यांची सेवा अधिग्रहीत करण्यात आलेली होती. त्यानुसार १३२ नालासोपारा मतदारसंघात १३४ आणि वसई मतदारसंघांत ८६ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी अतिकालिक भत्ता मिळावी, अशी मागणी लावून धरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT