मुंबई

बदलापूर शहराचा कारभार वाऱ्यावर

CD

बदलापूर, ता. ३० (बातमीदार) : नियुक्त मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची काही दिवसांच्या कालावधीतच तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची अद्यापही नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे बदलापूर पालिकेचा एकंदरीत शहराचा कारभार वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्वातंत्र्यदिनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या प्रशासकीय इमारतीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र, कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळला गेला नाही. जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी, प्रशासकीय अधिकारी; स्थानिक लोकप्रतिनिधींना योग्य वागणूक दिली नाही, असा आरोप मारुती गायकवाड यांच्यावर लावण्यात आला. यावर शहरात सर्वत्र चर्चाही झाली. त्यामुळे महिनाभरच बदलापूर पालिकेत आपला कारभार सांभाळणाऱ्या मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. ही बदली झाल्यानंतर अद्यापही मुख्याधिकारीपदी कोणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. बदली आदेशानंतर गायकवाड कुळगाव बदलापूर नगरपालिकेत येत नसल्याची माहितीही सूत्रांकडून मिळाली. त्यातच गायकवाड हे बदली रोखण्यासाठी प्रयत्नशील असून, यासाठी त्यांच्या विविध कार्यालयात वाऱ्याही सुरू असल्याची शहरात चर्चा रंगलेली आहे.

महत्त्वाचे निर्णय रखडले
आधीच बदलापूर शहरात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना, त्यात नव्या पालिकेच्या इमारतीत नव्याने सुरू झालेले प्रशासकीय काम या सगळ्यात निर्णय घेणारा कोणताही अधिकारी उपलब्ध नाही. त्यात अतिरिक्त मुख्याधिकारीपद हे बदलापूर पालिकेत नाही. उपमुख्याधिकारी पदावरही कोणताही अधिकारी अद्याप कार्यरत नाही. या सगळ्यांमुळे शहराशी संबंधित पालिकेतील महत्त्वाचे निर्णय रखडले असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे, निविदा, त्या संदर्भातील मंजुरी, बैठका या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मार्गी लागतील? कारण मुख्याधिकारी जागेवर नसतील तर ही, कामे होणार कशी? असा प्रश्न पालिकेतील कर्मचारी आणि शहरवासीयांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : SIR वरून निवडणूक आयोगात मतभेद?, आयोगाकडून स्पष्टीकरण; दोन आयुक्तांनी १० महिन्यांत १४ वेळा आक्षेप घेतल्याचा दावा

Job Fair: दहावी पास तरुणांना LIC सह १८ कंपन्यांत थेट मुलाखतीतून नोकरीची संधी! फक्त एकच अट, कसा करायचा अर्ज ?

Ausа Drought Crisis : देवाभाऊ, शेतकऱ्यांसाठी देवदूत बना! दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टाहो

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

SCROLL FOR NEXT