वाढदिवशी तरुणाचा अपघाती मृत्यू
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : मित्रांसह वाढदिवसाचा केक कापून आपल्या कारमधून घरी परतणाऱ्या तरुणाचा कार अपघातात मृत्यू झाल्याची घटना उलवे येथे घडली. अनिकेत बाळू पवार (वय २९) असे या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव असून रविवारी (ता. २९) मध्यरात्री ही घटना घडली. या अपघातात कारमधील इतर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. अनिकेतचा वाढदिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अनिकेत पवार हा उलवे येथील एका ट्रान्स्पोर्टरकडे चालक म्हणून काम करत होता. सोमवारी (ता. ३०) अनिकेतचा वाढदिवस असल्याने रविवारी मध्यरात्री त्याच्या मित्रांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. त्यासाठी अनिकेत आपल्या मित्रांसह कारने न्हावा गावात गेला होता. यावेळी अनिकेतने वाढदिवसाचा केक कापल्यानंतर जेवण करून सर्व मित्र रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी त्यांची कार न्हावा गाव येथून उलवेच्या दिशेने भरधाव वेगात जात असताना, न्हावा गाव येथील वळणावर अनिकेतचे कारवरील नियंत्रण सुटले. ही भरधाव कार दोन-तीन वेळा उलटली. या अपघातात अनिकेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला जखमी अवस्थेत बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. न्हावा-शेवा पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात अनिकेतचे मित्र किरकोळ जखमी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.