मुंबई

भरधाव रिक्षाची झाडाला धडक

CD

भरधाव रिक्षाची झाडाला धडक
चार महिलांसह रिक्षाचालक जखमी
नवी मुंबई, ता. ३० (वार्ताहर) : जासई येथून एनआरआय वसाहतीत जाणाऱ्या रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही रिक्षा रस्त्यालगतच्या झाडावर धडकल्‍याची घटना घडली. या अपघातात रिक्षामधील चार महिला व रिक्षाचालक असे पाच जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी एनआरआय वसाहतीलगत घडली. एनआरआय पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
अनुसया लिंबोळी (वय ४५), गंगा येरकर (वय ४६), सुलोचना कांबळे (वय ४०), नंदा येरकर (वय ४६) तसेच रिक्षाचालक स्वामी स्वरनार (वय ४५) असे या अपघातात जखमींची नावे आहेत. या अपघातातील चारही महिला उरणमधील जासई भागात राहण्यास असून त्या सीवूड्स येथील एनआरआय वसाहतीत घरकाम करतात. सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या चारही महिला जासई येथून स्वामी स्वरनार याच्या रिक्षामधून एनआरआय वसाहतीत येत होत्या. यावेळी तीन महिला रिक्षात पाठीमागे बसल्या होत्या. तर, चौथी महिला रिक्षाचालकाच्या बाजूला बसली होती. ही रिक्षा किल्ला जंक्शन येथून पामबीचलगतच्या सेवा रस्त्याने एनआरआय वसाहतीच्या दिशेने जात असताना दिल्ली पब्लिक स्कूलजवळ चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने ही रिक्षा रस्त्यालगतच्या झाडावर जोरदार धडकली. या अपघातात रिक्षामधील चारही महिला व रिक्षाचालक गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्या सर्वांना नेरूळमधील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात रिक्षाचालकाने भरधाव वेगात निष्काळजीपणे रिक्षा चालवून नेल्यामुळे हा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार एनआरआय पोलिसांनी रिक्षाचालक स्वामी स्वरनार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT