मुंबई

विक्रमगड विधानसभा शिवसेनेने लढावी

CD

जव्हार, ता. ३ (बातमीदार) : आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमगडसाठी महायुतीतून जव्हारला नेतृत्व करण्याची संधी मिळावी, अशी मागणी तालुक्यातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी केली आहे. दरम्यान, तालुक्यातील खंबीर व जबाबदार नेतृत्व; तसेच मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय विनायक राऊत यांना प्रथम पसंती देऊन त्यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घातली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.
काही वर्षांपासून जव्हार तालुक्यातील आमदार झाला नसल्याने विधानसभेचे प्रतिनिधित्व जव्हारला करता आले नाही. त्यामुळे तोंडावर आलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत विक्रमगडसाठी स्थानिक उमेदवार मिळाल्यास शिवसैनिक जोमाने त्या उमेदवाराचा प्रचार करून निवडून आणतील, अशी आशा जव्हारचे शिवसैनिक व्यक्त करत आहेत. जव्हार तालुका शिवसेना विक्रमगड विधानसभेसाठी आग्रही असून येणाऱ्या निवडणुकीत विक्रमगड विधानसभेचा उमेदवार हा पक्षाचाच असावा, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, तालुकाप्रमुख विनायक राऊत अथवा त्यांचे चिरंजीव कल्पेश राऊत यांच्या नावाच्या उमेदवारीची विक्रमगड मतदारसंघात जोरदार चर्चा सुरू आहे.

विक्रमगड विधानसभा जर शिवसेनेला दिली, तर तालुक्यातील शिवसैनिक जोमाने प्रचार करतील. जव्हारच्या आमदाराला प्रथमच विधानसभेत पाठवतील. यामुळे येथील विकासाला चालना मिळेल.
- विनायक राऊत, शिवसेना शिंदे गट तालुकाप्रमुख, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT