मुंबई

पूर्णवेळ वेतन अधिक्षकांची नियुक्ती करा

CD

पूर्णवेळ वेतन अधीक्षकांची नियुक्ती करा
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी
घाटकोपर, ता. १ (बातमीदार) ः वेतन कार्यालयामार्फत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दरमहाचे वेतन, भविष्य निर्वाह निधी, पुरवणी देयके, वैद्यकीय देयके पारित केली जातात. जवळपास वर्ष उलटूनही मुंबईच्या तिन्ही शिक्षक शिक्षण निरीक्षक कार्यालयांत पूर्णवेळ वेतन अधीक्षक नाहीत. इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोळवण होत असल्याचा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख युवराज कलशेट्टी यांनी केला आहे.
वेतन अधीक्षक वेळेवर उपलब्ध नसल्याने वेतन बिले उशिरा कोषागार कार्यालयात पाठविल्याने १ तारखेला मासिक वेतन मिळेल, याची शाश्वती राहिलेली नाही. प्रभावी ई कुबेर प्रणाली असूनही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यास दिरंगाई होत आहे. त्यामुळे कर्जाचे हप्ते बुडतात व नाहक दंड भरावा लागतो. सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहा महिने उलटूनही पेन्शन मिळत नाही. थकीत बिले वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. अंशतः अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अध्यापक विद्यालयांची टप्पा अनुदानावरील देयकेही वेळेवर पारित होत नाहीत. कधी कधी वैयक्तिक खात्‍यात वेतन जमा होण्यास २० ते २५ तारीख उजाडते. सहाव्या वेतन आयोगाची काही फरक बिले अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे मुंबईतील सर्वच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. पूर्णवेळ वेतन अधीक्षक नसल्याने या सर्व समस्या निर्माण होत असल्याचे मत संघटनेचे दक्षिण विभाग संघटक प्रकाश दांडेकर यांनी मांडले.

तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयांत पूर्णवेळ वेतन अधीक्षकांची नियुक्ती प्राधान्याने करावी, अशी मागणी केली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.
तानाजी कांबळे,
राज्याध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांचे वेळापत्रक कोलमडणार! पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक, अनेक गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल

SP Sandeep Singh Gill Statement : भोर नसरापूर चिमुकलीवर अत्याचार हत्याप्रकरणाचा एसपी संदीपसिंग गिल यांनी सांगितला घटनाक्रम

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Latest Marathi News Live Update : मंगरूळ गावात पाणी टंचाईचा स्फोट; ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा

SCROLL FOR NEXT