मुंबई

मुलुंडमध्ये धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध

CD

मुलुंडमध्ये धारावीकरांच्या पुनर्वसनाला विरोध
चेंबूर, ता. ३ (बातमीदार) ः केंद्र सरकारने धारावीकरांचे मुलुंड परिसरातील मिठागर जमिनीवर पुनर्वसन करण्याचे धोरण निश्चित केले आहे. यासाठी सुमारे ५६ एकर जागा ताब्यात घेणार आहे; मात्र या केंद्र सरकारच्या धोरणाला मनसेने कडाडून विरोध केला असून मनसे कार्यकर्त्यांनी मुलुंड तहसीलदारांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे.
मुलुंड येथील मिठागरे व डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले आहे; मात्र सरकारच्या या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मुलुंडकरांनी सरकारच्या धोरणाला विरोध केला आहे. मुलुंड परिसरातील तिवरांच्या जंगलात असंख्य दुर्मिळ जीवजंतूंच्या प्रजाती आहेत. या जंगलात दरवर्षी जगातील असंख्य फ्लेमिंगो पक्षी स्थलांतरित होत असताना या हजारो एकरच्या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने पर्यावरण धोक्यात येणार आहे. त्यामुळे या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन करण्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. कित्येक समस्यांचा मुलुंडकरांना सामना करावा लागणार असल्याने केंद्र सरकार व राज्य सरकारने योग्य निर्णय घेऊन धारावी प्रकल्पग्रस्तांचे धारावी परिसरातच पुनर्वसन करण्याची मागणी मनसेने केली आहे. शासनाने जबरदस्तीने धारावीकरांचे मुलुंड परिसरात पुनर्वसन केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Meeting NCP Leader : अमोल मिटकरीनंतर राष्ट्रवादीतील दुसरा नेता नाराज, थेट एकनाथ शिंदे यांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांची भूमिका महत्वाची

Nanded News: एटीएम सेवा केंद्रांचा बोजवारा;कधी पैशांची वानवा, तर कधी सुविधांची कमतरता;एसी शोभेची वस्तू , तुटलेले दरवाजे, निकामी यंत्रणा

कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही जितेंद्र यांची पत्नी, 'हे' फोटो पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल

Buddha Purnima: बुद्धांचा कालामसुत्त: स्वानुभवावर आधारित विवेकाचा उपदेश; सोशल मीडियाच्या युगात कालामसुत्ताचा तरुणांसाठी मार्गदर्शन

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

SCROLL FOR NEXT