हिरे घेऊन पळालेल्या आरोपीस अटक
तीन व्यापाऱ्यांची फसवणूक
अंधेरी, ता. ३ (बातमीदार) ः क्रेडिटवर घेतलेले हिरे घेऊन पळून गेलेल्या रणजीतभाई ऊर्फ राजूभाई रुखदभाई भखलकिया या आरोपीस बीकेसी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
तीन हिरे व्यापाऱ्यांकडील सुमारे ८९ लाखांच्या हिऱ्यांचा अपहार केल्याचा रणजीतभाईवर आरोप आहे. त्याच्याकडून लवकरच ते हिरे जप्त केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तक्रारदार हिरे व्यापारी असून त्यांचा वांद्रे येथील भारत डायमंड बोर्स येथे हिरेविक्रीचा व्यवसाय आहे. रणजीतभाई हा हिरे दलाल असून तो त्यांच्या परिचित आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात त्याने त्यांच्याकडून २८ लाख ४० हजार रुपयांचे हिरे विक्रीसाठी घेतले होते. एका आठवड्यात पेमेंट किंवा हिरे परत करण्याचे आश्वासन देऊन तो निघून गेला, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने पेमेंट केले नाही. चौकशीदरम्यान रणजीतभाईने अशाच प्रकारे इतर दोन हिरे व्यापाऱ्यांकडून क्रेडिटवर घेतले होते. या तिन्ही हिरे व्यापाऱ्यांकडून त्याने ८९ लाख ४० हजार रुपयांचे हिरे घेतले, मात्र त्यांना दिलेल्या मुदतीत पेमेंट न करता पलायन केले होते. तिन्ही व्यापाऱ्यांनी बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी रणजीतभाईविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शोधमोहीम सुरू असताना सहा महिन्यांपासून फरार असलेल्या रणजीतभाई याला अखेर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.