मुंबई

गरजू महिलांचे सबलीकरण करणारी दुर्गा

CD

गरजू महिलांचे सबलीकरण करणारी दुर्गा
अनेकींनी सुरू केला लाखोंची उलाढाल करणारा व्यवसाय

राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ३ : रोजगार, स्वयंरोजगाराच्या विविध प्रशिक्षणातून गरजू आणि बेरोजगार महिलांचे सबलीकरण करणाऱ्या अलका देवरे या ग्रामीण भागातील महिलांसाठी आजच्या दुर्गा ठरत आहेत. मागील दहा वर्षांत त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सुमारे सहा हजार बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांचे सबलीकरण केले आहे. महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्या हे काम करत आहेत.

सरकार विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न करते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. योजनेचा लाभ घेण्यासाठी बहुतांश महिलांना ई-डिजिटीलायझेशनचा मोठा फटका बसला. अनेक महिलांना ऑनलाइन आणि बँकिंग प्रक्रियेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागले. अशा महिलांनाही बँकिंग, ऑनलाइन सिस्टीमची संपूर्ण माहिती मिळावी, त्याही या कामात शिक्षित व्हाव्यात, असा प्रयत्न ठाण्यातील अलका देवरे २०१३ पासून करत आहेत. ग्रामीण भागातील १८ ते ४५ वयोगटाच्या महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, शेतीवर अवलंबून असलेला जोडधंदा करावा, असा या संस्थेचा प्रयत्न असतो. त्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांना शेतीला पूरक असलेल्या व्यवसायाने महिला आणि तरुणाईला प्रशिक्षित केले जाते. हे प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून पूर्णतः मोफत दिले जाते. त्यासाठी त्यांना निवासाचीदेखील सुविधा दिली जाते.

निवासी प्रशिक्षण करणाऱ्या उमेदवाराला जेवण आणि इतर सर्व साधने पुरवली जातात. शहरी भागासह ग्रामीण भागातील तरुण मुलांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उभा केला आहे. केंद्राच्या आयुषसारख्या उपक्रमातून मेडिसीन प्लांटच्या माध्यमातून गरजू आणि बेरोजगारांना स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत. यासाठी अलका यांनी संस्थेच्या माध्यमातून त्यांना मार्केटिंग संभाषण कौशल्य, बँकिंग प्रशिक्षण दिले आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यातदेखील ही संस्था आघाडीवर आहे. उद्योजक बनण्यासाठी, स्वयंरोजगार करण्यासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्राची आवश्यकता लागते. ते प्रमाणपत्र संस्थेमार्फत दिले जाते.

सबलीकरणासाठी प्रशिक्षण
पापड, लोणचे व मसाला बनविणे, टेलरिंग, ज्वेलरी बनविणे, फास्ट फूड उद्यमी, जूट प्रोडक्ट, कुक्कुटपालन, ब्युटी पार्लर, उद्योजकता विकास (छोटे उद्योजक), दुग्ध व्यवस्थापन आणि गांडूळ खत तयार करणे, मेन्स पार्लर आणि सलोन, घरगुती अगरबत्ती बनविणे, ज्वेलरी बनविणे, शेळीपालन, बांबू क्राफ्ट (बांबूच्या वस्तू तयार करणे), फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी, प्रवास आणि पर्यटक मार्गदर्शक, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षा अलार्म आणि स्मोक डिटेक्टर बसविणे आणि सर्व्हिसिंग, मशरूमची लागवड, औषधी आणि सुगंधी वनस्पती लागवड, दुग्ध व्यवस्थापन आणि गांडूळ खत बनविणे, मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, मेन्स पार्लर, पापड, लोणचे व मसाला बनविणे, कापडी कागदी पिशव्या, बँक सखी, शासकीय योजनांची माहिती आणि मदत.

मी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेच्या माध्यमातून अन्नप्रक्रिया प्रशिक्षण घेतले आहे. या प्रशिक्षणाच्या आधारावर पापड, लोणचे बनवण्याचा उद्योग सुरू केला आहे. उल्हासनगर येथील होलसेल मार्केटमध्ये पापड, लोणच्यांचा पुरवठा करते. यातून माझ्या उद्योगाची तीन-चार लाखांची वार्षिक उलाढाल होते.
- मीना आठवले, यशस्वी उद्योजिका, शहाड, ठाणे

मी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार संस्थेच्या मदतीने मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर एका बँकेतून तीन लाखांचे कर्ज घेतले होते. त्याच्या आधारे उद्योग सुरू केला असून सगळीकडे आगरी पद्धतीच्या मसाल्यांचे वितरण करते. लग्न समारंभात लागणारी हळद पुरवण्यात माझी कंपनी आघाडीवर आहे. व्यवसायाच्या माध्यमातून माझी वार्षिक आर्थिक पाच ते सात लाखांपर्यंतची आहे. या व्यवसायातूनच मी अनेकांना रोजगारदेखील देऊ शकले.
- रेखा पाटील, यशस्वी उद्योजिका, खरड, कल्याण

संस्थेच्या अलका देवरे आणि उद्योजिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे १५९ नागरिक बाधित

SCROLL FOR NEXT