मुंबई

ठाणे थोडक्यात

CD

स्वच्छता मोहिमेत युवकांसह महिलांचा सहभाग
अंबरनाथ (बातमीदार) : द युवा युनिटी फाउंडेशनच्या वतीने आणि ठाणे जिल्हा नेहरू युवा केंद्रांतर्गत युवा व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या मदतीने बुधवारी (ता. २) महेंद्रनगर येथे स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेत युवकांसह परिसरातील महिलांनी सहभाग घेतला. सहभागींनी जय श्रीराम चौक ते डॉ. अब्दुल कलाम समाजमंदिरापर्यंत येणाऱ्या मुख्य रस्त्यावर साफसफाई केली. तसेच, कीटकनाशक औषधांची फवारणी केली. अंबरनाथ नगर परिषदेचे स्वच्छतादूत, द युवा युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश चलवादी यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी संस्थेचे नूर शेख, अमित तिवारी, अंकिता ठोकळ, तेजश्री जाधव, रीमा दुबे, प्रभावती गुप्ता, बिनू चौधरी, अर्चना पांडे, शालू गुप्ता, मीना चौधरी, मधू कनोजिया, शहनाज खान, सलमा शाह इत्यादी उपस्थित होत्या.
....................
राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत सिद्धार्थ विद्यामंदिर तृतीय
कल्याण (वार्ताहर) : भारत विकास परिषद, कल्याण पूर्व यांच्या माध्यमातून विविध शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागातून मंगळवारी आंतरशालेय समूहगान स्पर्धा आयोजित केली होती.
कल्याण पूर्वचे अध्यक्ष हेमंत दरगोडे यांच्या नियोजनाखाली स्पर्धा झाली. या स्पर्धेत हिंदी, संस्कृत आणि देशभक्तिपर गीतगायन स्पर्धा घेण्यात आली. यात विद्यार्थी सहाय्यता प्रतिष्ठानच्या सिद्धार्थ विद्यामंदिर कल्याण पूर्व शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. संस्थेच्या सचिव शुभा गुप्ते, शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मिला साळुंखे, अशोक काठे, सुनीता वंजारी, रामदास चौरे यांनी मेहनत घेतली. तसेच, सर्व शिक्षक, पालक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक पटकाविल्याबद्दल शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
...........................
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन
कळवा (बातमीदार) : अखिल भारतीय कुर्मी (मराठा-कुणबी) क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन रविवारी (ता. ६) छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या अधिवेशनासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, कुर्मी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही. एस. निरंजन, राष्ट्रीय महासचिव डॉ. उमेश कुमार पटेल, राष्ट्रीय महिला अध्यक्षा लता ऋषी चंद्रकार, राष्ट्रीय संरक्षक एल. पी. पटेल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज पाटीदार, उद्योग महासभा राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वर्मा, तसेच मराठा सरदार लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सतीश चव्हाण हे विशेष उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा-कुणबी बांधवांना कुर्मी भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती महासभेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. तर, छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्रनाथ टागोर सभागृह, देवगिरी महाविद्यालय येथे कुर्मी महासभेचे राज्य अधिवेशन पार पडणार आहे.
या अधिवेशनासाठी मराठा-कुणबी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक विजय काकडे यांनी केले आहे. या राज्य अधिवेशनाला तमिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, बिहार सर्व राज्यातून अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे अखिल भारतीय ‌कुर्मी क्षत्रिय महासभेचे प्रदेश महासचिव जयेश शेलार, तसेच महासचिव प्रमोद ठोंबे पाटील ठाण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.
........................
राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन
कल्याण (वार्ताहर) : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त अवधूत तावडे, संजय जाधव, शिक्षणाधिकारी विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनीदेखील महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पसुमने अर्पण केली. डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी उद्यानातील, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सहाय्यक आयुक्त राजेश सावंत व सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी उपस्थित इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग व नागरिकांनीदेखील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या प्रतिमेला अभिवादन केले.
.............................
स्वामीनारायण मंदिर संस्थेच्या स्वच्छता अभियानाला प्रतिसाद
कल्याण (वार्ताहर) : महात्मा गांधी जयंतीनिमित्त डोंबिवली पूर्वेला स्वामी नारायण मंदिर संस्थेच्या माध्यमातून बुधवारी (ता. २) स्वच्छता अभियानाचे अयोजन केले होते. राजाजी पथ येथील स्वामी नारायण मंदिर ते पुढील चौकापर्यंत उपक्रमाचे आयोजन केले होते. यात संस्थेचे स्वामी हरिचरण दास महाराज, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. त्या दोघांनीही स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर मंदिराचे शेकडो भक्त रस्त्यावर उतरले आणि त्यांनी परिसरातील जोड रस्त्यांची स्वच्छता केली. दरवर्षी असा उपक्रम होत असून सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी त्या उपक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे हरिचरण दास म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता विषयाला प्राधान्य देत विविध उपक्रम आयोजित करून स्वतः त्यात सहभागी होतात. आधी केले आणि मग सांगितले, ही उक्ती पंतप्रधान मोदींची असून ती अनुकरणीय असल्याचे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. या उपक्रमात भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष, ज्येष्ठ माजी नगरसेवक विष्णू पेडणेकर, दिनेश गौर, मंदार हळबे, अमित कासार यांसह पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
.......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT