मुंबई

केळव्यात नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन

CD

पालघर, ता. ५ (बातमीदार) : केळवे परिसरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार विद्युत ट्रान्स्फॉर्मरवर येणाऱ्या अतिरिक्त भारामुळे नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन माजी खासदार राजेंद्र गावित यांनी दांडा खाडी येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याच्या सूचना केल्या आहेत. या कामासाठी आर्थिक तरतूदही गावित यांनी उपलब्ध करून दिल्याने येत्या काही महिन्यांत हा प्रश्न मार्गी लागेल, असे आश्वासन महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप खानांदे यांनी राजेंद्र गावित आणि केळवेतील व्यावसायिकांना दिले आहे.

केळव्यातील पर्यटन व्यवसायिकांनी माजी खासदार राजेंद्र गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात अधिकारी आणि केळवे पर्यटन व्यावसायिक यांची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी खानांदे यांच्याकडे पर्यटक व्यावसायिकांनी आपल्या मागण्या मांडल्या. या वेळी अनेक मागण्या मान्य केल्याचे आश्वासन अधीक्षक अभियंत्यांनी दिले. खासदारांनी दांडा खाडी येथे २०० केव्ही क्षमतेच्या नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्याच्या सूचना केल्या व त्याला जिल्हा नियोजन विभागातून आर्थिक तरतूद करून दिली. या बैठकीला महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील भारंबे, अधिकारी स्वप्नील घरत, तसेच केळवे बीच पर्यटन उद्योग विकास संघाचे आशीष पाटील, संजय घरत, रोहित राऊत, दिनेश सावे, हर्षल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Transfer: मोठी बातमी! पोलीस विभागात महत्त्वाचा फेरबदल; चार आयपीएस आणि दोन राज्य पोलीस अधिकाऱ्यांची बदली, कारण काय?

Viral Video : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकताच, शिवम दुबे ट्रेनने तातडीने मुंबईसाठी रवाना का झाला? भारतीय खेळाडूने सांगितलं कारण...

हेमा मालिनी नव्हे 'ही' होती चित्रपटातली खरी 'शोले' गर्ल; ५० वर्षांनंतर कशी दिसतेय बसंती? फोटो पाहून वाटेल आश्चर्य

Latest Marathi News Live Update : महापौर रितू तावडेंच्या अडचणी वाढल्या ! शिक्षक मारहाण प्रकरणात दोषमुक्तीला न्यायालयाचा नकार

Mumbai Local: कल्याण-सीएसएमटी लोकल १५ डब्यांच्या करा, श्रीकांत शिंदे यांची मागणी

SCROLL FOR NEXT