ड्रोनमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
किन्हवली, ता. ३ (बातमीदार) : काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात सतत घिरट्या घालणारे ड्रोन ग्रामस्थांच्या नजरेस पडत आहे; मात्र त्याचा मोबाईल कॅमेऱ्यात फोटो काढण्याचा प्रयत्न केल्यास ड्रोन बंद होऊन गायब होते. त्यामुळे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावावा, यासाठी ग्रामस्थांनी गुरुवारी किन्हवली पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे.
शहापूर तालुक्यातील शेणवा-डोळखांब रस्त्यावर चांदगाव येथे नाक्यावर नव्याने बाजारपेठ वसली आहे. येथील लोकसंख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. परिसराच्या दोन्ही बाजूला हिलस्टेशन आहे. त्यामुळे तेथे अनेक श्रीमंत व्यक्तींनी फार्महाऊस, तसेच बंगले बांधले आहेत. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी ग्रामस्थांच्या घरांवर उंच भागात अज्ञात ड्रोन गस्त घालत आहे. त्यांचा मोबाईलमधील कॅमेऱ्यात फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता ड्रोनची सिग्नल लाइट बंद होते.
सध्या समाजमाध्यमांवर काही चोरांच्या टोळ्या ड्रोनच्या माध्यमातून माहिती गोळा करून चोऱ्या किंवा दरोडे घालतात, असे संदेश फिरत असल्याने स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय किंवा पोलिस ठाण्यामध्ये ड्रोन उडवण्याची अशी कोणतीच परवानगी घेतलेली नसल्याने चांदगावच्या स्वागत विशे, विकी विशे, अजय आरज, प्रमोद हरणे, नवनाथ हरणे व दीपक हरणे आदींनी किन्हवली पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.