कल्याण, ता. ५ (वार्ताहर) : भारत देश जैवविविधतेने नटलेला आहे. या जैवविविधतेत विविध वन्यजीव अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांच्या परस्परसंबंधाविषयी माहिती व्हावी, त्याच्याविषयी जनजागृती व्हावी, यासाठी २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा भारतीय वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहाचे औचित्य साधून पर्यावरण दक्षता मंडळ विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल प्रबोधन निर्माण व्हावे, यासाठी दरवर्षी निसर्गमेळा आयोजित करते. हा निसर्गमेळा दरवर्षी एक विशिष्ट संकल्पसूत्रासह साजरा केला जातो. यावर्षीचा निसर्गमेळा ‘कारवी महोत्सव’ म्हणून श्रीरंग शाळा येथे साजरा करण्यात आला.
पर्यावरण दक्षता मंडळ, श्रीरंग एज्युकेशन सोसायटी, एन्विरो व्हिजिल आणि रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट याच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. ४) चित्रकला स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ, इंधनाशिवाय पाककृती स्पर्धा, एक मिनिट स्पर्धा, पथनाट्य, पर्यावरण गीत, रांगोळी, सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. इंधन न वापरता पाककला बनविणे, या स्पर्धेचे विशेष म्हणजेच फळभाज्या, काही पालेभाज्या, काही कडधान्य यांचा वापर करून एखादी पाककला इंधनाशिवाय बनवू शकतो, हे या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवायला मिळाले. त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धेचा विषय पाणथळभूमी हा होता. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून दिलेल्या विषयावर अप्रतिम चित्रे काढली.
पर्यावरण वाचविण्यासाठी पर्यावरण गीत हे जनजागृतीचे परिणामकारक माध्यम आहे. विविध पर्यावरण गीते या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सादर केली. या निसर्गमेळ्याचे विशेष म्हणजे सर्व स्पर्धांच्या ठिकाणी स्पर्धकांना कारवीची प्राथमिक माहिती परीक्षकांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.