मुंबई

मंदा म्हात्रे रुग्णालयासाठी आक्रमक

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ : नवी मुंबई महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीवर न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नवी मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देताना स्वकियांकडूनच विरोध केला जात आहे. अशा घटकांविरोधात उतरून आंदोलन करण्याचा इशारा बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिला आहे.
भविष्यात नवी मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी शासनाकडून वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा प्रकल्प मंजूर केला होता. या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला वेगाने सुरुवात होणार होती. पालिका प्रशासनाकडे सततच्या पाठपुराव्यानंतर प्रशासकीय स्तरावरील अंदाजे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्याची निविदा निघाली होती; पण काही समाजविघातक लोकांनी प्रकल्पाविरोधात न्यायालयात धाव घेतल्यामुळे या प्रकल्पाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे गोरगरिबांना मिळणारी आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागल्याने न्यायालयीन स्थगिती थांबवून गुरुवारी, १० ऑक्टोबरला सकाळी जनआंदोलन करणार आहे. तसेच, प्रकल्पांमध्ये अडथळे आणणाऱ्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशाही म्हात्रे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खरातशी संबंधित मालमत्ता बड्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांच्या नावे, ईडीचा ससेमिरा मागे लागणार; सरकारी बाबूंचे धाबे दणाणले

US-Iran War: ''रात्रीतून सगळं संपेल...'' इराणसोबतच्या बैठकीवरुन अमेरिकेचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: भामट्यांनी दोन दिवसांत हिसकावले तिघींचे मंगळसूत्र; सांगा, रात्री घराबाहेर जाणे टाळावे का?

Chhatrapati Sambhajinagar: उभ्या ट्रकला आयशर धडकला; वडोद बाजार फाट्यावरील घटना; चालक गंभीर जखमी

महाराष्ट्राला उष्णतेच्या लाटेचा इशारा, अकोला जगात सर्वात उष्ण शहर, टॉप १५ मध्ये राज्यातली पाच शहरं

SCROLL FOR NEXT