मुंबई

आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी सानपाड्यात गुन्हा

CD

वाशी, ता. ३ (वार्ताहर) : मराठा समाजासह महिलांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह विधान नाशिकमधील एका व्यक्तीने केले आहे. दोन समाजांत तेढ निर्माण करण्यासाठी हा हेतुपुरस्सर प्रयत्न असून सकल मराठा समाजाच्या तक्रारीनंतर सानपाडा येथे दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ओबीसी समाजासाठी आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून पुण्यातील मराठा समाजातील तरुणांनी जाब विचारला होता. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत असताना नाशिकमधील श्रावण देवरे याने फेसबुक पोस्टमधून मराठा समाज आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले. ही बाब लक्षात आल्यानंतर सकल मराठा समाजाचे नवी मुंबईचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी सानपाडा पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. या आक्षेपार्ह विधानामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच, दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे देवरेविरोधात गुन्हा दाखल करावा, तसेच फेसबुकवरील पोस्ट तत्काळ डिलीट करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT