मुंबई

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये वाद

CD

बदलापूर, ता. ३ (बातमीदार)ः विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर शहरातील उमेदवाराचा आढावा घेण्यासाठी आलेल्या पक्ष जिल्हा निरीक्षकांच्या समोरच माजी खासदार कपिल पाटील आणि स्थानिक आमदार किसन कथोरे यांचे समर्थक भिडले. या वादामुळे एकीकडे निरीक्षकांवर बैठक रद्द करण्याची नामुष्की तर ओढावली तर दुसरीकडे भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी मंडळाकडून प्रत्येक मतदारसंघात आढावा बैठका घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्वेकडील एका खासगी सभागृहात गुरुवारी जिल्हा निरीक्षक गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वात आढावा बैठक झाली. या बैठकीसाठी बदलापूर शहरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्रित आले होते. यावेळी उमेदवार निश्चितीसाठीच्या निवडणुकीत भाजप मंडळामधील यादीत आमदार किसन कथोरे यांच्या समर्थकांची नावे वगळल्याचे दिसून आले. याच कारणावरून अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश पाटील आणि ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांच्यात शाब्दिक वादाला सुरुवात झाली. तर, हाणामारीही झाल्याने निरीक्षकांना बैठकच रद्द करावी लागली.
------------------------------------------
पक्षांतर्गतच वादाचा फटका उमेदवाराला
वादावादीच्या वेळी मोहपे यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाने रिव्हॉल्वर काढल्याने बैठकीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, निरीक्षकांनी
नवीन यादी तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतरच उमेदवार निश्चितीसाठी पक्षांतर्गत बैठक होणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गतच वादाचा फटका उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जय शिवराय! 'या' सिनेमागृहात 'राजा शिवाजी' सिनेमा मोफत पाहता येणार, पहा संपूर्ण यादी

HSC result 2026 Maharashtra : बारावीचा निकाल 2 मे रोजी, 'या' लिंकवर निकाल पाहता येणार

Sunetra Pawar Banner in Pandharpur : 'माझा विठ्ठल...!' देवघरात अजितदादांची प्रतिमा, आता पंढरपूरच्या वेशीवर सुनेत्रा पवारांसाठी 'तो' बॅनर चर्चेत!

Mumbai Pune Expressway Traffic : वाहतूक कोंडीत अडकलेल्या वाहनांकडून टोल घेऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचना

Who is Arshad Khan? मुंबई इंडियन्सने पहिली संधी दिली अन् तो आता गुजरात टायटन्ससाठी ठरतोय एक्स फॅक्टर; RCB लाही दिलाय त्रास

SCROLL FOR NEXT