सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : बाळासाहेब असताना सर्वजण मातोश्रीवर येत होते; मात्र आता त्यांचे वारसदार दिल्लीतील गल्लीबोळात मुख्यमंत्रिपदासाठी फिरत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत लगावला. ठाण्याच्या टेंभीनाका येथील देवीच्या आगमन सोहळ्यात पत्रकारांची संवाद साधताना त्यांनी ही टीका केली.
ठाण्यातील टेंभीनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. हा उत्सव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे. देवीच्या आशीर्वादाने विविध कल्याणकारी योजना आणल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा काळ आणि गेल्या अडीच वर्षांत महायुतीने केलेली कामे यांचे मूल्यमापन जनता करेल. तसेच, आई जगदंबेच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील जनता पुन्हा महायुती सरकारला कौल देईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी जागावाटपात कोणतीही नाराजी नसून महायुती निवडणुकीला अधिक घट्टपणे सामोरे जात आहे. तसेच, जुना शिवसैनिक आजही धनुष्यबाणाकडे असल्याचे लोकसभा निवडणुकीत दाखवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
-----------------------------------------------
ठाकरे बॅकफूटवर ः म्हस्के
शरद पवार आणि कॉँग्रेसचे नेते उद्धव ठाकरे यांना कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत. पवार फोन उचलत नाहीत. महाविकास आघाडी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरे हताश असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच, पत्रकार परिषदेत सावरकर यांच्याबाबत उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील, असे वाटले होते. त्यांच्या नावात ठाकरे आहे. ते पूर्वी आमचे नेते होते; पण आता ते शिथिल झाले असून बॅकफूटवर गेल्याची टीकाही म्हस्के यांनी यावेळी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.