बोर्डी (बातमीदार)ः घोलवड पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील चिखले वडकती पाडा समुद्रकिनारी रात्रीच्या वेळी संशयास्पद बोट आढळल्याने पंचक्रोशीमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. वडकती पाडा भागातील काही तरुण मासेमारीसाठी गेले असता त्यांना ही बोट आढळली. अमावस्येला आलेल्या मोठ्या भरतीमुळे ही बोट भरकटल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या बोटीबद्दलची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले; मात्र काहीच हाती लागले नसल्याने पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.