मुंबई

शाळेचे विश्वस्त, मुख्याध्यापिकेला जामीन

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता.४ ः बदलापूर शाळेत दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील सहआरोपी असलेल्या शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल, सचिव तुषार आपटे यांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने दुसऱ्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला, तर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांनादेखील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला.
बदलापूर शाळेत चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला आहे, तर फरारी असलेल्या शाळेचे अध्यक्ष कोतवाल, सचिव आपटे यांना दोन दिवसांपूर्वी कर्जत येथून अटक करण्यात आली होती. या दोघांना गुरुवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने एका गुन्ह्यात दोघांना जामीन मंजूर केला होता, पण दुसऱ्या गुन्ह्यात पोलिस कोठडी दिली होती. दरम्यान, शुक्रवारी पोलिसांनी पुन्हा कोतवाल आणि आपटे यांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. या वेळी न्यायाधीश पी. पी. मुळे यांनी दोघांना जामीन मंजूर केला, तर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले शरण आल्याने त्यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
----------------------------------------------
न्यायालयातील युक्तिवाद
सरकारी वकील अश्विनी भामरे-पाटील यांनी गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पाच दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर न्यायाधीश मुळे यांनी याप्रकरणी सरकारी पक्षाने म्हणणे मांडावे, असे सांगितले होते. आरोपी दोन दिवस पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना म्हणणे मांडण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे, तसेच गुन्ह्यातील कलम जामीनपात्र असल्याने त्यांना पोलिस कोठडी देता येत नाही. गुन्हा गंभीर असणे आणि त्याचे कलम जामीनपात्र असणे, या दोन्ही स्वतंत्र बाबी असल्याचे न्यायाधीशांनी या वेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

Latest Marathi News Live Update : जेव्हा कधी काहीतरी चांगले घडते, तेव्हा विरोधक तक्रारी करतातच, नारी शक्ती वंदन विधेयकावर कंगना रानौत यांची प्रतिक्रिया

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Aarey Milk: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! ‘आरे’ दूध पुन्हा बाजारात येणार, तारीख आली समोर, स्टॉलधारकांना दिलासा

SCROLL FOR NEXT