मुंबई

महारेराच्या नव्या संकेतस्थळामध्ये त्रुटी

CD

‘महारेरा’च्या नव्या संकेतस्थळामध्ये त्रुटी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : ‘महारेरा’ने नुकत्याच सुरू केलेल्या ‘महाकृती’ या नवीन संकेतस्थळामध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे घर खरेदीदार, विकसक, प्रवर्तक, एजंट्स आणि इतर भागधारकांची गैरसोय होत आहे. याची ‘महारेरा’ने गंभीर दखल घेतली असून जुने संकेतस्थळ पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुने संकेतस्थळ शनिवार (ता. ५)च्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. दिवाळी, दसरा या सणासुदीच्या काळात नवीन घरांची नोंदणी करणे, नवीन घर विकत घेणे, विकसकांनी नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे, असे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. ही काम करताना सर्व संबंधितांना ‘महाकृती’ संकेतस्थळातील तांत्रिक त्रुटींमळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी त्याची दखल घेतली असून गैरसोय टाळण्यासाठी जुने संकेतस्थळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जुने संकेतस्थळ ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ११.५९ वाजल्यापासून वापरात येणार आहे. सर्व संबंधितांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि महारेराला सहकार्य करावे, असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breaking : रोहित शर्मा पंजाब किंग्सविरुद्धचा सामना नाही खेळणार! मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, माघारीचं कारण अस्पष्ट; सलामीला कोण?

"त्यावेळी मला खूप त्रास झाला" मुलाच्या नावाच्या ट्रोलिंगवर चिन्मयची पत्नी अखेर व्यक्त;"तुम्हाला अधिकार नाही"

LPG Booking Updates: ग्राहकांसाठी मोठा दिलासा! जुनी सुविधा पुन्हा सुरू... आता बुकिंग कसं बदललं ते जाणून घ्या

Thane Hospital: हेलीपॅड, एअर अ‍ॅम्ब्युलन्स, ९०० बेड अन्...; ठाण्यातील नवे हॉस्पिटल गेमचेंजर ठरणार, कोणत्या सुविधा मिळणार?

तू इतकी चांगली आहेस मग... तमन्ना भाटियाला हॉटेलच्या मालकाची पत्नी असं काहीतरी बोलली की... अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT