मुंबई

प्रतिक्षा संपली, आज मेट्रो-३ चे लोकार्पण

CD

मोदींच्या हस्ते आज मेट्रो-३चे लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : आरे-बीकेसी हा मेट्रो-३चा पहिला टप्पा शनिवारी (ता. ५) सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी हिरवा झेंडा दाखवून मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण करणार आहेत. मोदी ठाण्यातील कार्यक्रम आटोपून बीकेसीत येणार आहेत.
मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आरे-कफ परेड ही भूमिगत मेट्रो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मेट्रो मार्गाचे एकूण काम ९२ टक्के पूर्ण झाले आहे, तर बीकेसी-आरे हा टप्पा पूर्ण झाला असून मेट्रो सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे ही मार्गिका प्रवासी सेवेत आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून शनिवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले. या लोकार्पण कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री मनोहर लाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
...
मोदी मेट्रोने प्रवास करणार
ठाणे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी मोदी प्रथम ठाण्यात जाणार असून तेथील कार्यक्रम संपल्यानंतर मेट्रोच्या लोकार्पणासाठी बीकेसी येथे येणार आहेत. मेट्रोला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदी बीकेसी-सांताक्रूझ आणि पुन्हा बीकेसी असा मेट्रो प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो कनेक्ट-३ हे मोबाईल ॲप लाँच केले जाणार आहे.
...
ठाण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ऑनलाइन भूमिपूजन व उद्‍घाटन, तसेच ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या महिला लाभार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार सोहळा पार पडणार आहे. ठाणे शहरांतर्गत वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन, पूर्वमुक्त मार्ग विस्तार छेडानगर (घाटकोपर) ते आनंदनगर (ठाणे) प्रकल्पाचे भूमिपूजन, नैना नगररचना परियोजनांतर्गत विविध पायाभूत सुविधा कामांचे भूमिपूजन, ठाणे महापालिकेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन असे विविध कार्यक्रमही पार पडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT