विरार (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेने प्रभाग समिती ‘सी’ चंदनसारअंतर्गत विरार पूर्व येथे टोटाळे तलावावर गणेशमूर्ती विसर्जनाची सोय केली होती. या तलावात विसर्जनासाठी पालिकेमार्फत पोहता येत असलेल्या स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. १८ सप्टेंबर रोजी अमित सतीश मोहिते (वय २४, रा. फुलपाडा) हा विसर्जन करतेवेळी फिट आल्याने पाण्यात बुडाला होता. त्यावेळी त्याला अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले; परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेऊन आमदार क्षितिज ठाकूर यांनी मृताच्या कुटुंबीयांना पालिकेकडून आर्थिक मदत मिळण्यासाठी आयुक्त अनिलकुमार पवार यांना पत्राद्वारे कळविले होते. शुक्रवारी (ता. ४) पालिकेमार्फत आर्थिक मदतीचा पाच लाखांचा धनादेश मृत युवकाच्या कुटुंबीयांना आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, उपायुक्त सदानंद पुरव, सहाय्यक आयुक्त विक्टर डिसोजा, मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.