मुंबई

नवरात्रोत्सव

CD

कमळाच्या फुलांना मागणी

रसायनी, ता. ५ (बातमीदार) ः वासांबे-मोहोपाडा येथे बाजारपेठेत नवरात्रोत्‍सवानिमित्त कमळाची फुले बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आली आहेत. आदिवासी वाड्यांतील आदिवासी बांधव महिला फुले घेऊन येत असल्‍याने त्‍यांना रोजगाराचे साधन मिळाले आहे. एका फुलाला दहा ते १५ रुपयांचा भाव मिळत असल्‍याचे गुळसुंदे आदिवासी वाडीतील विक्रेत्यांनी सांगितले.
ग्रामीण भागात तलावात, दलदलीत कमळाची फुले बहरली आहेत. सप्टेंबरनंतर साधारण फुले उमलण्यास सुरुवात होते. गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्‍सवात या फुलांना मोठी मागणी असते. यातून आदिवासी महिलांना रोजगार मिळतो. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील दांडफाटा येथील श्री टाकेदेवी आई माऊलीच्या दर्शनाला दरवर्षी भाविकांची रीघ लागते. याशिवाय ग्रामदेवतेच्या मंदिरातही भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे वासांबे-मोहोपाडा बाजारपेठेत लागणाऱ्या वस्तूंना तसेच हार, नारळ, अगरबत्ती, ओटी-पूजा साहित्‍याच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.

--------
वाशीच्या जगदंबा माता मंदिरात विविध कार्यक्रम
पेण, ता. ५ (वार्ताहर) : तालुक्यातील वाशी येथील भवानी जगदंबा माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक, आध्‍यात्‍मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दररोज देवीचा अभिषेक, देवता वस्‍त्रालंकार, आभूषणे परिधान करून पूजा पाठ, सकाळी नऊ ते अकरापर्यंत शास्‍त्रोक्‍त विधी, साडेअकरा वाजता महाआरती, रात्री नऊ वाजता कीर्तन, देवता पूजन, नवग्रह हवन, धान्य हवन यांसह दररोज विविध उपक्रम होत आहेत. मंगळवारी भजन आयोजित केले असून विभागातील सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वाशीतील देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आले आहे.

.................

रोह्यात ग्रामदेवता धावीर महाराजांना गाऱ्हाणे
रोहा, ता. ५ (बातमीदार) ः देशात ज्या दोन देवस्थानांना पोलिस सशस्त्र मानवंदना देण्याची प्रथा ब्रिटिश काळापासून सुरू आहे, त्यापैकी एक रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराज देवस्‍थान असून गुरुवारी मंगलमय वातावरणात विधिवत देवघटी बसले. यावेळी देवाला गाऱ्हाणे घालण्यात आले आणि महाराजांच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली.
रोहा शहराच्या पश्चिम बाजूला हनुमान टेकडीच्या पायथ्याशी श्री धावीर महाराजांचे सुंदर आणि भव्य मंदिर आहे. गाभाऱ्यात श्री धावीर महाराज, कालिका माता, बहिरीबुवा वाघबाप्पामागे तीन वीरा यांचे स्थान आहे. मंदिराबाहेर महाराजांचा अंगरक्षक चेडा देवाचे स्थान आहे. महाराजांना विधिवत देवघटी बसवताना, सेवा करताना काही चुका झाल्‍यास गोड मानून घे, गावावर येणारे संकट दूर कर, असे गाऱ्हाणे घालण्यात आले. त्‍यानंतर अक्षतांची उधळण करीत उत्साहात सुरुवात झाली. गोंधळाची आरती, विविध वाद्य आणि घंटानादाने आसमंत दुमदुमून गेला होता. मंदिरात विजयादशमीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT