ठाण्यात गॅसगळतीमुळे स्फोट
एक जण किरकोळ जखमी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : दादा पाटीलवाडी परिसरातील कृष्णा कॉम्प्लेक्स या इमारतीच्या तळमजल्यावरील विजया नेवासे यांच्या घरात सिलिंडर गॅसची गळती झाल्याने अचानक भडका उडून आग लागली. ही घटना शनिवारी (ता. ५) सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. यात घराच्या दरवाजाजवळ उभा असलेला सतेंद्र कुमार (२८) हा तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
शनिवारी सकाळी नेवासे या नाश्त्यासाठी गॅस चालू करून रूमच्या बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी गॅसगळती होऊन अचानक भडका उडाला. यावेळी नेवासे या बचावल्या असून त्याच परिसरात राहणारा सतेंद्र हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. त्यानुसार घटनास्थळी पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल विभागांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. तसेच, उडालेल्या भडक्यात नेवासे यांच्या घरातील फॅन, दरवाजा आदी साहित्यांचे तुटून नुकसान झाले आहे, असेही आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.