मुंबई

महापालिकेच्या वास्तूंना कलर कोड पालघर स्पेशल

CD

प्रकाश लिमये, भाईंदर
भारतातील अनेक शहरे त्याच्या रंगसंगतीमुळे ओळखली जातात. यामुळे त्या शहराला वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळेच त्याचे वेगळेपण मनात कायम राहते. मिरा-भाईंदर शहरानेदेखील आगामी काळात आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी शहरातील महापालिकेच्या विविध वास्तू, रस्ते दुभाजक, पदपथ, सार्वजनिक ठिकाणच्या भिंती यांची रंगसंगती (कलर कोड) काय असावी, याचे धोरण महापालिकेकडून निश्चित करण्यात आले आहे. याद्वारे मिरा-भाईंदर शहराचे ब्रँडिंग करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

काही महिन्यांपूर्वी महापालिकेने मिरा-भाईंदर@२०४७ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत सीटी ब्रँडिंग हा विषय सर्वाधिक चर्चेत आला होता. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच शहराची ओळख निर्माण व्हावी, यासाठी पायाभूत सुविधांचे ब्रँडिंग करावे, असा विचार परिषदेतून पुढे आला. त्यानुसार श्हारातील पायाभूत सुविधांच्या नवनिर्मितीच्या विविध संकल्पनांचा थीम आधारित प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. त्यात महापालिकेच्या विविध वास्तूंना कलर कोड असावा, वास्तूंची अथवा विकासकामांची निर्मिती करताना ती दर्जेदार असावी, यासाठी वापरण्यात येणारे साहित्य कोणते असावे, याचा समावेश करण्यात आला आहे.

आतापर्यंत शहरातील महापालिकेच्या वास्तूंना वेगवेगळे रंग देण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख लवकर पटत नाही; मात्र यापुढे रंगसंगती दिसली की महापालिकेची ती नेमकी कोणती वास्तू आहे, याची ओळख सहज पटणार आहे. महापालिकांच्या वास्तू, त्याचप्रमाणे विकासकामे करताना दर्जा व टिकाऊपणा यावर भर दिला जाणार आहे, अन्यथा वारंवार देखभाल दुरुस्तीची कामे निघून वायफळ खर्च होतो. यासाठी बांधकाम साहित्य नेमके कोणते असावे, त्याचा दर्जा काय असावा, एवढेच नाही तर शहरात लावण्यात येणारे सर्व नामफलक व दिशादर्शक फलक यासंदर्भातील धोरणही प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.

वेगळेपण जपण्याचा प्रयत्न
महापालिकेच्या शहरातील हिंदू, मुस्लिम व ख्रिस्तधर्मीयांच्या स्मशानभूमींना पिवळा रंग दिला जाणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांना निळा व राखाडी, अग्निशमन केंद्र व समाजभवनांना लाल, महापालिकेच्या सर्व शाळांना निळा व पिवळा, रुग्णालये व आरोग्य केंद्र, उद्याने, मैदाने यासाठी हिरवा व सफेद, मंडईसाठी पिवळा व राखाडी, पाण्याच्या टाक्यांसाठी हिरवा व राखाडी, रस्ते दुभाजकांना काळा व पांढरा, पदपथांना राखाडी अशा पद्धतीची रंगसंगती निश्चित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे यापुढे रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करताना त्याठिकाणची सर्व झाडे एकाच जातीची असणार आहेत, जेणेकरून संपूर्ण रस्त्याला एकाच रंगांची फुले येऊन त्याचे वेगळेपण दिसून येणार आहे.

या धोरणाद्वारे मिरा-भाईंदर शहराची स्वत:ची ओळख निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे महापालिका वास्तूंची दर्जात्मक सुधारणा होऊन महापालिकेच्या खर्चात बचत होणार आहे.
- दीपक खांबित, शहर अभियंता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT