मुंबई

तलासरीत उभारले ‘वेस्ट वंडर पार्क’

CD

कासा, ता. ५ (बातमीदार) : स्वच्छता पंधरवड्यानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यात जनजागृती आणि विविध मोहिमा राबवण्यात आल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्रात उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. यामध्ये तलासरी नगरपंचायतीकडून राबवलेला ‘वेस्ट वंडर पार्क’ टाकाऊपासून टिकावू हा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला आहे.
तलासरी नगरपंचायतीच्या हद्दीत स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहिमा, मॅरेथॉन आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धकांमधून विजयी स्पर्धकांना बक्षिसे वितरण केले. याच उपक्रमांतर्गत नगरपंचायतीने ‘टाकाऊपासून टिकावू’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी टाकाऊ प्लास्टिक आणि काचेच्या बाटल्यांचा वापर करून तलासरी नगरपंचायतीसमोरील मोकळ्या जागेत ‘वेस्ट वंडर पार्क’ तयार केले आहे. उद्यानामध्ये विविध झाडांच्या रोपांची लागवडही करण्यात आली आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी ‘वेस्ट वंडर पार्क’चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मॅरेथॉन आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा; तसेच नगरपंचायत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला नगरपंचायत मुख्याधिकारी भूषण माने, नगराध्यक्ष सुरेश भोये, उपनगराध्यक्ष सुभाष दुमाडा, नगरसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते.

कमी खर्चात अनोखी बाग
तलासरी नगरपंचायतच्या ‘वेस्ट वंडर पार्क’ उद्यानाच्या निर्मितीसाठी फक्त चार ते पाच हजार रुपये खर्च झाल्याचे मुख्याधिकारी भूषण माने यांनी सांगितले. बाग सजवण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. सिमेंट आणि रंगरंगोटी करण्यासाठी थोडासा खर्च झाला आहे. अगदी कमी खर्चात ही बाग तयार केली असून, महामार्गालगत असलेल्या या बागेने येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधले आहे.

टाकाऊपासून टिकावू अशी बाग निर्माण केली असून, यामध्ये छानशी झाड लावली आहे. अगदी कमी खर्चात वेस्ट वंडर पार्क निर्माण झाले असून, याचा आनंद घ्यावा. नगरपंचायतीतर्फे या बागेची निगा राखली जाईल. नागरिकांनीही येथे स्वच्छता राखावी.
- भूषण माने, मुख्याधिकारी, तलासरी नगरपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT