मुंबई

विणीसाठी ठाण्यात आलेले नवरंग निघाले मायदेशी

CD

विणीसाठी ठाण्यात आलेले नवरंग निघाले मायदेशी

राजीव डाके : सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ५ : दक्षिण भारतातून ठाणे, मुंबईत दाखल झालेले नवरंग पक्षी आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला ते ठाणे, मुंबईत येतात. अंडी घालून पिलांना जन्म देतात, ती वाढवतात आणि त्यांच्या पंखात उडण्याचे बळ येताच चार महिन्यांच्या मुक्कामानंतर त्यांना सोबत घेत शेकडो किलोमीटरचे अंतर कापत परत आपल्या मूळ ठिकाणी दक्षिण भारतात निघून जातात.

हिवाळ्याच्या ऋतूत ठाणे, मुंबईच्या जंगलात, खाडीकिनारी अनेक परदेशी पक्ष्यांची रेलचेल पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यातील नदी, खाडीकिनारी, जंगल परिसरात त्यांचे दर्शन घडते. येथील खाडीकिनाऱ्याचा काहीसा ऊबदार हिवाळ्यामुळे ते येथे आकर्षित होतात. येथे वास्तव्य करतात; पण हा ऋतू सोडून पावसाळ्यातसुद्धा काही पक्षी येथे वास्तव्याला येतात. त्यापैकीच नवरंग हा पक्षी आहे.

साळुंखीच्या आकाराचा आणि निसर्गाने त्याच्यावर नऊ रंगांची उधळण केलेली असल्याने त्याला हे नाव पडले आहे. हा पक्षी मे महिन्याच्या शेवटी ठाणे, मुंबईत येतो. त्याच्या जोडीला काही विदेशी पक्षीदेखील येथे येतात. नवरंग पक्ष्याचे इंग्रजीत इंडियन पिटा असे नाव आहे. तो दक्षिण भारतातून मजल दरमजल करत येथे पोहोचतो. येताना हे पक्षी जोडीने (नर, मादी) येतात. झाडीझुडपात राहणे त्याला पसंत आहे. येथे तो विणीसाठी येतो. जून ते ऑगस्ट महिना हा कालावधी त्याच्यासाठी विणीचा हंगाम असतो. यातील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात.

गवत, झाडाची मुळे, काड्या आदींपासून तयार केलेल्या घरट्यात पक्ष्याची मादी चार ते सहा अंडी देते. विविध प्रकारचे कीटक त्यांचे मूळ खाद्य आहे. अशी माहिती पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक माधव आठवले यांनी दिली. या दिवसांमध्ये जंगल भागातून भटकंती करताना कानावर ‘व्हीट-टयू’ अशी शीळ हमखास पडते. शिळीच्या आवाजाच्या दिशेने बारकाईने पाहिल्यास भगवा, पिवळा, हिरवा, निळा, काळा, पांढरा, पोपटी, किरमिजी अशा रंगांच्या छटांनी मोहून टाकणारा नवरंग नजरेला पडतो, असेही आठवले म्हणाले. तर, दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ, तमिळनाडू आदी भागांतून विणीच्या हंगामात नवरंग उत्तरेकडे झेपावताना, त्यातील काही ठाणे आणि मुंबईत येतात, अशी माहिती पक्षी अभ्यासक हिमांशू टेंभेकर यांनी दिली.

बारावी धरण परिसरातील झाडीझुडपात अनेक पक्ष्यांचा निवारा आहे. पावसाळ्यात लांबचा प्रवास करून येणारे तिबोटी खंड्या, कोकीळ कुळातले पक्षी पावश्या, चातक, भारतीय कक्कू आदी पक्षी येथे वास्तव्याला असतात.
- माधव आठवले, पक्षी अभ्यासक

दक्षिण भारतातून येणारा नवरंग पक्षी पश्चिम घाट, महाराष्ट्र, मध्य भारत परिसरात याच काळात स्थलांतर करतो. मे ते सप्टेंबर या दिवसात तो येथे राहतो. मुख्यतः दाट जंगलात त्याचे वास्तव्य असते. ठाणे, मुंबईच्या दाट झाडीच्या पट्ट्यात तो हमखास दिसून येतो.
- हिमांशू टेंभेकर, पक्षी अभ्यासक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT