मुंबई

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस डिसेंबरअखेरीस

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : देशातील पहिले आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल मुंबईतील बीपीएक्स-इंदिरा डॉक येथे उभारण्याचे काम तीन वर्षांपासून सुरू आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस जुलै २०२४ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येणे अपेक्षित होते. अजूनही या टर्मिनसचे काम अपूर्ण असल्याने निश्चित केली डेडलाइन हुकली होती. आता डिसेंबरअखेरीस हे क्रूझ टर्मिनल सुरू होईल, अशी माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.
केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी सागरमाला उपक्रमांतर्गत मुंबई येथे भारतातील पहिल्या प्रकारच्या आयकॉनिक सी क्रूझ टर्मिनल उभारण्याची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस हे भारतातील अशा प्रकारचे पहिले आयकॉनिक सी क्रूझ टर्मिनस असून ४.१५ लाख वर्गफूट क्षेत्रावर हे टर्मिनल बांधण्यात येणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने हे टर्मिनस जुलै २०२४पर्यंत सुरू होणे अपेक्षित होते. या टर्मिनसचे काम अपूर्ण असून उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनस प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी डिसेंबर २०२४ची डेडलाइन देण्यात आलेली आहे. त्यानंतर जानेवारी २०२५ मध्ये प्रवाशांच्या सेवेत नवी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल दाखल होणार आहे.
-----
४९५ कोटींचा खर्च
आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलच्या उभारण्यासाठी एकूण खर्च ४९५ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यापैकी ३०३ कोटी मुंबई पोर्ट ट्रस्ट खर्च करणार आहे. उर्वरित खर्च खासगी ऑपरेटर्सकडून केला जात आहे.
......
क्रूझ प्रवाशांची संख्या वाढली
देशातील क्रूझ पर्यटनाच्या प्रचंड क्षमतेला चालना देण्यासाठी बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने क्रूझ भारत मोहिमेचा शुभारंभ केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी नुकताच मुंबईत केला आहे. सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे २०१४ पासून क्रूझच्या प्रवासी संख्येत ४०० टक्‍के वाढ झाली आहे. ‘क्रूझ भारत मिशन’ने फेऱ्यांची संख्या यापुढे आणखी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. मुंबईतील आयकॉनिक सी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल डिसेंबरपर्यंत कार्यान्वित झाल्यास या मिशनला आणखी हातभार लागेल, असे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT