मुंबई

एन विभागात महास्वच्छता अभियान

CD

एन विभागात महास्वच्छता अभियान
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एन विभाग पालिकेच्या वतीने महास्वच्छता अभियान आणि ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाचा सांगता सोहळा झाला. परिमंडळ सहाचे उपआयुक्त संतोष धोंडे, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक अभियंता सूर्यकांत सातपुते यांच्या वतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर व पारशीवाडी जामा मशीद परिसरात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी हातात झाडू घेऊन सफाई कर्मचाऱ्यांसोबत मोहिमेत सहभाग घेतला. सफाई कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी गौरव केला. या मोहिमेत माजी नगरसेवक दीपक हांडे हेदेखील सहभागी झाले होते.
२०२४ यावर्षी अनेक मंडळांनी, तसेच घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या कुटुंबांनी पर्यावरणपूरक उत्सव साजरा केल्याबद्दल यंदा अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचा सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

पर्यावरण संवर्धनाची शपथ
स्वच्छता पंधरवडानिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एन विभागात ‘एक पेड मां के नाम’ या उपक्रमाचा सांगता सोहळा करण्यात आला. या वेळी पश्चिम आणि पूर्वमध्ये मोकळे भूखंड आणि उद्दानात प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त असणाऱ्या झाडाचे वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन करण्याची या वेळी शपथ घेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT