मुंबई

समुदाय आरोग्‍य अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष

CD

समुदाय आरोग्‍य अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष
महिला डॉक्‍टरांचे आंदोलन
मुंबादेवी, ता. ९ (बातमीदार) : एकीकडे सर्वत्र शारदेय नवरात्रीचा उत्‍साह असताना धन्वंतरीच्या रूपात ग्रामीण भागातील उपकेंद्र स्तरावर आरोग्य सेवा देणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकारीपदावरील महिला डॉक्टरांनी सोमवारी (ता. ७) आझाद मैदानावर आंदोलन केले.
या आंदोलनात पुरुष डॉक्टरांच्या बरोबरीनेच राज्यभरातून आलेल्या महिला डॉक्टरांपैकी डॉ. दर्शना टावरे, डॉ. मयुरी गावडे, डॉ. मीनल मोकल आणि डॉ. कृपाली सोनावले यांनी नवरात्रीचा उपवास करीत आंदोलनात सहभाग घेतला. पेण येथून आलेल्या डॉ. मीनल मोकल म्हणाल्या, आम्ही दुर्गम भागात दिवस-रात्र सेवा देत आहोत. कोरोना काळातही जीव धोक्यात घालून काम केले. आज आम्ही पाच वर्षे सेवा देत असताना अवघ्या २८ हजार ७४० रुपये मासिक मानधनावर राबवले जात आहे. या सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये महिला डॉक्टरांची संख्या अंदाजे ६० टक्के आहे. नियमित शासकीय सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या धर्तीवर मासिक वेतन मिळावे, अशी मागणी समुदाय आरोग्‍य अधिकाऱ्यांनी राज्‍य सरकारकडे केली आहे.
आमचे सहकारी डॉ. गणेश बाहेती, डॉ. अली कुरेशी, डॉ. गोयल रावते, डॉ. ऋतूजा वानखेडे, डॉ. गणेश शेळके, पल्लवी कदम यांचे सेवाकाळात दुर्दैवाने निधन झाले. यांच्या कुटुंबीयांना सरकारने आर्थिक मदत आणि शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी मयुरी गावडे यांनी केली. राज्यभरातील नऊ हजार ५०० डॉक्टरांचे भवितव्य सरकारच्या हाती असल्याने त्यांना तत्काळ न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. अंकुश मानकर, प्रकाश मोरे, डॉ. अजित पाटील, डॉ. कृपाली सोनावले यांनी या वेळी केली.
पुणे, नगर, सातारा, सांगली, कऱ्हाड, गडचिरोली, भंडारा, रायगड अशा राज्यातील ३० जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून आलेले समुदाय आरोग्य अधिकारी सहभागी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: देशात पहिल्यांदाच! ३२ वर्षीय तरुणासाठी सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाला मंजुरी; काय आहे संपूर्ण प्रकरण?

शेतकऱ्याची जमीन हायवेत गेली, १.७७ कोटी मिळाले; पण १८ वर्षांच्या लेकानं गेमिंगमध्ये गमावले, फसवणूक झाल्यानं विष प्यायला

Gudi Padwa 2026 : गुढीपाडव्याला नवी गाडी घेताय? वाहन खरेदीसाठी अमृत वेळ, शुभ मुहूर्त, राशीनुसार योग्य रंग...सर्वकाही पाहा एका क्लिकवर

प्रसिद्ध मसाला ब्रँड वादाच्या भोवऱ्यात; चाचणीत ‘एंटरबॅक्टेरिएसी’ जिवाणू आढळल्याचा दावा, हा बॅक्टेरिया नेमका काय आणि आरोग्यासाठी किती धोकादायक?

Latest Marathi News Live Update : NCERT पुस्तकांच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT