मुंबई

महिलांच्या मासिक पाळीतील रहस्यांचा उलगडा

CD

महिलांच्या मासिक पाळीतील रहस्यांचा उलगडा
एसएनडीटीच्या विद्यार्थिनींचा ‘ब्लीड विथ प्राइड’ कार्यक्रम
मुंबई, ता. ९ : स्त्रियांचा मासिक धर्म आणि त्याकडे भारतीय संस्कृती आणि त्या परंपरेच्या माध्यमातून निर्माण झालेल्या मंदिर प्रथांकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसे पाहता येईल, त्यामागे असलेली वैज्ञानिक कारणे याचा अत्यंत समर्पकपणे उलगडा करत स्त्रियांच्या मासिक धर्माला वैज्ञानिक अधिष्ठान मिळवून देण्याचे काम एसएनडीटी विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींनी केला आहे.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या प्रेरणा कुमारी झा आणि हर्षिता सिंग या दोन मुलींनी ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून एक नवीन पायवाट निर्माण केली आहे. या मासिक धर्माला त्यांनी ‘सात्विक ऋतू’ असे नाव देऊन ‘ब्लीड विथ प्राइड’ या नावाखाली महिलांमध्ये यासंदर्भातील विविध विषयांची जनजागृती करण्यात येत आहे.
हा प्रकल्प एसएनडीटी विद्यापीठाच्या उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘डाटाबाईट’ आणि ‘इनोवारी’च्या सामंजस्य कराराअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नेवेक्स एन्टरप्रायझेससोबत सॅनिटरी पॅड वेंडिंग आणि डिस्पोजल मशिन्स पुरवण्याचे काम केले जाते. सोशल मीडियावर सक्रियपणे जनजागृती करण्यासाठी आकर्षक सामग्री आणि मुलाखतींच्या माध्यमातून सात्विक ऋतू हा विषय व्यापक स्तरावर मांडण्यात येत आहे.
भविष्यात आम्ही स्वतःचे उत्पादन लॉन्च करणे, प्रीमियम फीचर्ससह मोबाईल अ‍ॅप विकसित करणे, एआय आधारित जनुकीय समुपदेशन प्रणाली सादर करणे यांसारख्या योजना आखल्या आहेत. महाराष्ट्रातील उल्हासनगरमध्ये मासिक पाळीबद्दलच्या गैरसमजांमुळे महिलांना होणारा मानसिक त्रास लक्षात घेता, सात्विक ऋतू हा मंच अशा समस्यांवर अत्यंत प्रभावी ठरतो. याच उपक्रमाचे आंतर-विद्यापीठ नवोपक्रम स्पर्धांमध्ये सादरीकरण करण्यात आले आहे आणि वर्ल्ड बँक, भारतीय लघुउद्योग विकास बँकेच्या शिष्टमंडळांसमोर सादर करण्यात आले आहे, असे प्रेरणा कुमारी आणि हर्षिता हिने सांगितले.
एसएनडीटी विद्यापीठात सुरू करण्यात आलेला ‘सात्विक ऋतू’ हा मंच भारतीय वैदिक ज्ञान आणि प्राचीन शहाणपणाच्या माध्यमातून मासिक पाळीशी संबंधित रहस्ये उलगडण्याचे काम करतो. समाजातील मासिक पाळीविषयी असलेला गैरसमज, रूढी, आणि अंधश्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून उत्तर देणे, महिलांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्यासाठी तज्‍ज्ञांच्या मदतीने उपाय शोधणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आम्ही स्त्रीरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ आणि समुपदेशकांसोबत महिलांना त्यांच्या समस्यांवर वैज्ञानिक उपाय उपलब्ध करून देतो.
मासिक पाळीविषयी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकत्र आणून महिलांना आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा देणे आणि समाजात सशक्त परिवर्तन घडवणे हा ‘सात्विक ऋतूचा’ उद्देश आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या https://satvikritu.in या संकेतस्थळावर महिलांना असंख्य प्रकारची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. भारतासह जगभरातील महिलांना याचा लाभ होत आहे.

मोफत तपासणी, समुपदेशन
सात्विक ऋतूचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे मासिक पाळीला एक नैसर्गिक आणि सामान्य प्रक्रिया म्हणून समाजाला स्वीकारण्यास भाग पाडणे, तसेच पुरुषांनाही याबद्दल जागरूक करणे हे आहे. ‘ब्लीड विथ प्राइड’ या कार्यक्रमाद्वारे आम्ही वेबसाइटचे अधिकृत उद्‌घाटन केले, ज्यामध्ये २०० हून अधिक महिलांनी सहभाग घेतला आणि मोफत वैद्यकीय तपासणी व समुपदेशन मिळवले. सर्व वयोगटांसाठी, विशेषत: शाळकरी मुलींपासून ते रजोनिवृत्ती झालेल्या महिलांपर्यंत विविध जनजागृती मोहिमा राबवल्‍या जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Vidhan Bhavan Bomb Threat: विधानभवनात बॉम्बची धमकी! ई-मेलनंतर मुंबईत खळबळ; पोलिस-बॉम्ब स्क्वॉडची धावपळ, मोठी शोधमोहीम सुरू

Latest Marathi News Live Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, विदर्भासह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत तापमान 40 पार जाण्याची शक्यता!

LPG Cylinder Price Hike : गॅस संकट गडद, जाणून घ्या तुमच्या शहरात आज किती आहे LPG सिलिंडरचा दर ?

शुभमंगल सावधान! इशा डेचं धुमधडाक्यात लग्न, सोशल मीडियावर फोटो VIRAL

LPG Gas Crisis: पंधरा दिवस युद्ध चालल्यास गॅस संकट गडद; इंधन दरवाढीसह आयातीवर परिणाम साठेबाजी रोखण्याचे आव्हान

SCROLL FOR NEXT