मुंबई

चार लाखांची लाच घेणारा पोलिस जाळ्यात

CD

नवी मुंबई, ता. ९ (वार्ताहर) : एनआरआय सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांना बेलापूर येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून चार लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई शाखेने मंगळवारी (ता. ८) रात्री रंगेहाथ पकडले. सतीश कदम यांनी या बांधकाम व्यासायिकाला वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून त्याच्याकडे ५० लाख रुपये लाचेची मागणी करून त्याच्याकडून १४ लाख रुपये उकळले होते. या कारवाईनंतर नवी मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
जुलै महिन्यामध्ये बेलापूर येथील शहाबाज गावात इंदिरा निवास इमारत कोसळली होती. या प्रकरणात एनआरआय पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक महेश कुंभार याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश कदम यांनी महेश कुंभार याला विविध गुन्ह्यात अडकवून त्याच्यावर गंभीर कलमे लावण्याची धमकी दिली होती, तसेच या प्रकरणातून वाचण्यासाठी कदम यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती कुंभार याने १८ लाख रुपये देण्याची तयारी दर्शविल्यानंतर महेश कुंभार यांचा मुलगा अजय कुंभार याने २३ सप्टेंबर रोजी १२ लाख आणि २७ सप्टेंबर रोजी दोन लाख रुपये सतीश कदम यांना दिले होते.
----------
एनआरआय पोलिसांनी कुंभार याच्या विरोधात एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातसुद्धा सतीश कदम यांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती; मात्र कुंभार याच्या मुलाने चार लाख रुपये देण्याची तयारी दर्शवून सतीश कदम यांच्या विरोधात थेट मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने सतीश कदम यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मंगळवारी रात्री पोलिसांनी सापळा लावला होता. रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास सतीश कदम यांनी उलवे येथील राहत्या घरी अजय कुंभार याच्याकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारल्यांनतर लाचलुचपत पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT