मुंबई

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन

CD

अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन
१२ नोव्हेंबरपासून सुरू होणार पहिला वर्ग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते बुधवारी महाराष्ट्रातील दहा नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा उद्घाटन सोहळा पार पडला. याअंतर्गत अंबरनाथ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचेदेखील उद्घाटन पार पडले. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने या महाविद्यालयाचे काम मार्गी लागले असून यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून १२ नोव्हेंबर रोजी पहिला वर्ग भरणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही या सोहळ्याला ऑनलाइन प्रणालीच्या माध्यमातून मुख्य उपस्थिती होती. अंबरनाथ शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर यांचा सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रतिनिधींच्या या पाठपुराव्यामुळे अंबरनाथच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाला मंजुरी मिळाली होती. १०० विद्यार्थी क्षमता असलेले महाविद्यालय आणि ४३० खाटांचे रुग्णालय अशी याची रचना आहे. यासाठी अंबरनाथ पूर्वेतील २१ एकर आरक्षित जागेवर इमारत उभारण्यासाठीही यापूर्वीच मंजुरी आणि ४०३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षात प्रवेश होऊन अंबरनाथमध्ये अभ्यासक्रम सुरू होईल अशी आशा होती. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे सातत्याने प्रयत्न देखील सुरू होते. याच पार्श्वभूमीवर आज राज्यातील दहा नव्या वैद्यकीय महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला. महाविद्यालयाच्या आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. या महिन्याच्या ५ तारखेपासून विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून १२ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार आहेत.

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी आवश्यक सर्व प्रकारची तयारी महाविद्यालय व्यवस्थापनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी आवश्यक प्राध्यापकांची भरती पूर्ण झाली असून प्रयोगशाळा, सामुग्री, वर्ग, विद्यार्थ्यांच्या रहिवासासाठी वसतिगृहाचे पर्यायही उपलब्ध झाले आहेत.
- डॉ. संतोष वर्मा, अधिष्ठाता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

'मुरांबा' मालिकेत मोठा ट्विस्ट; अक्षय आणि रमाच्या आयुष्यात 'ती' पुन्हा येणार; प्रेक्षक मात्र संतापले

SCROLL FOR NEXT